Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : जळगावमध्ये जोरदार राडा; दोन गटात जुन्या वादातून दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण

Jalgaon News : दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने दुचाकींवरून शिवीगाळ करीत तेथे उभ्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात धावपळ सुरु झाली होती

संजय महाजन

जळगाव : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत तरुणाच्या दोन गटात जुन्या वादातून दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत मागील काही दिवसांपासून दोन गटांत धूसफूस सुरू होती. याच दरम्यान रात्रीच्या सुमारास काही तरुण परिसरातील स्वामी समर्थ चौकातील अपार्टमेंट जवळ उभे होते. याच वेळी दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने दुचाकींवरून शिवीगाळ करीत तेथे उभ्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात धावपळ सुरु झाली होती.

दहा- पंधरा जणांना अटक 

रात्रीच्या अंधारात झालेल्या दगडफेकीमुळे नागरिक भयभीत झाले होते. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन पळापळ सुरु झाली होती. घटनेची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येताच दगडफेक करणाऱ्या संशयित तेथून पसार झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील दहा ते पंधरा जणांना एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेत अटक केली आहे. 

सीसीटीव्हीत घटना कैद 

दोन गटातील तरुणांच्या दगडफेकीची घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताची ओळख पटवून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण पसल्याने रात्री उशिरा परिसरात दंगा नियंत्रण पथक व पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भाजपची पॉवर, मनसे नेत्यासह ४ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Drunk Police Constable: मद्यधुंद पोलिसाची 6 गाड्यांना धडक, पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप|VIDEO

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

SCROLL FOR NEXT