जळगाव : जळगाव शहरातील एका डॉक्टराच्या घरातून २४ लाखांची चोरी झाली होती. यात रोख रकमेसह सोन्याची बिस्किटे देखील चोरीला गेली होती. या चोरीचा उलगडा झाला असून घरात काम करणाऱ्या मोलकरणीनेच ही चोरी करत घर आणि दुचाकी खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात वास्तव्यास असलेले डॉ. प्रकाश चित्ते यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने घरातून वेळोवेळी चार लाखांची सोन्याची बिस्किटे आणि २० लाख रुपयांची रोकड, असा एकूण २४ लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. याबाबत डॉ. चित्ते यांनी पोलिसात तक्रार दिली होती. डॉ. चित्ते यांनी संशयित छायाबाई संग्राम विसपुते या महिले विरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. चित्ते यांच्याकडे कामावर असलेल्या मोलकरणीला घरात सर्वत्र फिरायची. तर डॉ. दांपत्य दिवसभर रुग्णालयातून येणारी रक्कम कुठे ठेवतात. याबाबत सर्व माहिती तिला असल्याने मोलकरीण दोघे पती- पत्नी रुग्णालयात जाताच घरातील कपाटातून ठराविक रक्कम काढून घेत होती. असे करत आठ महिन्यांत या मोलकरणीने २० लाखांच्या जवळपास रक्कम लंपास केली. घरातून सोन्याचे बिस्कीट चोरीला गेल्याचे आढळल्यानंतर डॉक्टरांना चोरीचा संशय आला. तपासणी केली असता अनेक दिवसांपासून चोरी सुरू असल्याचे आढळल्यावर चित्ते दांपत्याने पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान छाया विसपुते या महिलेने डॉक्टराच्या घरात चोरी करून जळगावातच एक फ्लॅट खरेदी केला. तसेच दोन वाहने देखील खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीनुसार संशयित महिलेची चौकशी सुरू असून, ठोस पुरावा आढळून आल्यानंतर महिलेला अटक करण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन अव्हाड यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.