Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : जळगाव हादरले; कुसुंबा येथे घरावर दगडफेक करत केला गोळीबार

Jalgaon News : घराच्या दिशेने गोळीबार करत ३ राउंड फायर केले आहेत. मात्र हल्ल्या मागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या घटनेने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला

संजय महाजन

जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे एका घरावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर अचानकपणे हल्ला चढविला आहे. गाडीवर आलेल्या आठ ते दहा जणांनी सुरवातीला दगडफेक केली. यानंतर गोळीबार केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून कुटुंबीय देखील भयभीत झाले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

जळगाव तालुक्यातील कुसुंबा ये गावातील चंद्रशेखर त्र्यंबक पाटील यांच्या घरावर हल्ला झाला आहे. चंद्रशेखर पाटील हे कुरिअरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान पाटील हे कुटुंबियांसोबत घरात असताना जेवणाला बसलेले होते. याच वेळी अज्ञात हल्लेखोर घराच्या बाहेर आले. यानंतर त्यांनी त्यांच्या घरावर अचानकपणे हल्ला करत पसार झाले आहे. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही.  

गाडीची केली तोडफोड 

या दरम्यान हल्लेखोरांनी घराबाहेर उभी असलेली दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी घराच्या दगडफेक केली. तसेच घराच्या दिशेने गोळीबार करत ३ राउंड फायर केले आहेत. मात्र हल्ल्या मागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या घटनेने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला असून कुटुंबीय भयभीत झाले आहेत.

पोलिसांचा फौजफाटा दाखल 

दरम्यान घटना घडल्यानंतर लागलीच पोलीस गावात दाखल झाले. हल्ला करण्यात करण्यात आलेल्या पाटील यांच्या घराच्या समोर पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांना घराबाहेर बंदुकीच्या गोळीच्या २ रिकामी पुंगळी आणि घरामध्ये १ पुंगळी मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: खोकल्याचं औषध ठरलं विष; 14 मुलांचा मृत्यू, कफ सिरपबाबत सरकारचा निर्णय काय?

Karmala Fort History: मुंबईच्या समुद्रकिनारी असलेले जुने गड, करमाळा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

'जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा' विजय वडेट्टीवार संतापले

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला, उपसरपंचाचा मुलगा पाण्यात वाहून गेला, २३ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

Nagpur Health Crisis : विषारी औषध की मेंदूज्वर? नागपूर आणि मध्यप्रदेशातील बाल मृत्यूमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT