Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Jalgaon News : रामानंदनगर पोलिस पथकाने १० ऑगस्टला सायंकाळी छापा टाकून देहविक्रय व्यवसाय चालवणाऱ्या दांपत्याला अटक केली. एका २३ वर्षीय पश्चिम बंगाल येथील तरुणीची सुटका केली.

Rajesh Sonwane

जळगाव : शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनीच्या भरवस्तीतील घरात देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांनी याठिकाणी छापेमारी करत या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. यात देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेत या ठिकाणाहून पश्चिम बंगालमधील तरुणींची सुटका करण्यात आली आहे. 

जळगाव शहरातील रामानंदनगरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीवरून शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनीत घरात चालविल्या जात असलेल्या देहविक्रीच्या धंद्यावर छापा टाकला. पोलीस पथकाने डमी ग्राहकाला घटनास्थळी रवाना केले. यानंतर ग्राहकाने पोलिसांना इशारा दिल्यानंतर कॉलनीतील दोन मजली घरावर छापा टाकला असता अवैध प्रकारे चालविल्या जाणाऱ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे. 

तरुणीची सुटका 

दरम्यान पोलिसांना घरात दिनेश संजय चौधरी (वय ३५) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती ऊर्फ भारती चौधरी (वय ४२) खालच्या खोलीत बसलेले दिसले. तर वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली असता, तेथे तरुणी व डमी ग्राहक आढळून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. पती- पत्नीला ताब्यात घेतले असून तरुणीची सुटका करण्यात आली आहे. 

पती- पत्नीवर गुन्हा दाखल 

भरवस्तीत अवैधपणे देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या पती- पत्नी विरोधात पोलिस कर्मचारी अर्चना घुनावत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोलिस नाईक मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी आदींनी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abir Gulaal Release: दिलजीत दोसांझचे नियम फॉलो करतोय फवाद खान; अबीर गुलाल 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Maharashtra civic polls : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेस नेत्याची मोठी मागणी, पत्रात काय म्हटलंय?

कृष्ण जन्माष्टमीला घरात कोणत्या ठिकाणी मोरपिस ठेवणं शुभ?

Nurse: नर्सला 'सिस्टर' का म्हणतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

Hernia : लठ्ठपणा आणि हर्निया यांचा संबंध काय? कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT