Soldier Death : गुढे येथील जवानाला पश्‍चिम बंगालमध्ये वीरमरण; कुटुंबीयांचा आक्रोश

Jalgaon Bhadgaon News : स्वप्नील सोनवणे चार महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर सुटी घेऊन ते गावी येणार होते. यापूर्वीच त्यांना वीरमरण आले असून कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे
Soldier Death
Soldier DeathSaam tv
Published On

जळगाव : भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा सुरक्षा सैन्य दलातील ५७ बटालियनमध्ये जी. डी. कॉन्स्टेबलपदावर कार्यरत जवानाला पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पार्थिवावर १२ ऑगस्टला गुढे या त्यांच्या मूळ गावावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे गावातील स्वप्नील सुभाष सोनवणे (वय ३९) असे मृत झालेल्या जवानाचे नाव आहे. स्वप्नील सोनवणे हे २०१४ मध्ये भारतीय सैन्य सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती झाले होते. सध्या ते पश्चिम बंगालमध्ये ५७ बटालियन जी. डी. कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते. शनिवारी (ता. ९) राखी पौणिमेच्या दिवशी देशसेवा बजावताना रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे पत्नी कविता, मुलगी योगेश्‍वरी, मुलगा रूद्राक्ष, आई कल्पना, विवाहित बहीण असा परिवार आहे. 

Soldier Death
Amravati Police : अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; एमडी, गांजा, विदेशी मद्य जप्त

कुटुंबीयांचा आक्रोश 
स्वप्नील सोनवणे यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. तर रक्षाबंधनाच्या दिवशीच स्वप्नील सोनवणे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या बहिणीला रडू आवरत नव्हते. तर या घटनेने संपूर्ण गुढे गाव परिसरावर शोककळा पसरली आहे. 

Soldier Death
Navapur News : खदानीत पोहायला गेले असता घडले भयंकर; महिलांच्या मदतकार्याने एकाला जीवदान, एकाचा बुडून मृत्यू

उद्या होणार अंत्यसंस्कार 

दरम्यान स्वप्नील यांचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक पश्र्चिम बंगालमध्ये रवाना झाले आहेत. त्यांचे पार्थिव बीएसएफ ५७ बटालियनचे जवान घेऊन विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर येणार आहेत. यानंतर मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यानंतर  गावी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com