JALGAON SHOCKER: FATHER ALLEGEDLY KILLS DAUGHTER, SON CRITICALLY INJURED IN CHOPDA AXE ATTACK Saam tv
महाराष्ट्र

Shocking : जळगाव हादरलं! जन्मदात्या बापाने २ मुलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात जन्मदात्या बापाने मुलगी आणि मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे.

Alisha Khedekar

  • जळगावच्या चोपडा तालुक्यातील वडती गावात धक्कादायक घटना

  • जन्मदात्या बापाने दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

  • हल्ल्यात मुलीचा मृत्यू , तर मुलगा गंभीर जखमी

  • आरोपीला अटक

जळगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात जन्मदात्या बापानेच आपल्या दोन मुलांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असून या हत्येमागे नेमकं काय कारण आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात भिलाला कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील सुभाष भिलाला याला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत. आज सकाळच्या सुमारास सुभाषने संतापाच्या भरात त्याची मुलगी मीरा सुभाष भिलाला आणि मुलगा रामु सुभाष भिलालावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मीराचा मृत्यू झाला असून रामू गंभीर जखमी झाला आहे.

जखमी रामूला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणातील आरोपी सुभाष भिलालाने या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनेनंतर तो जवळच्या जंगलात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली.

अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहेत. एका निष्पाप मुलीचा जीव गेल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. अडावद पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट, २२ फुटी बाप्पाची मूर्ती अचानक कोसळली, २ जणांचा मृत्यू, ५ गंभीर

Sunday Horoscope : नव्या गोष्टी अनुभवाल, या ५ राशींचा ताण वाढणार की कमी होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

मगरीच्या हल्ल्याचा थरार, आईसाठी मुलगी थेट मगरीशी भिडली

भारतात 2027 मध्ये कमी पाऊस, 100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती

SCROLL FOR NEXT