corona death saam tv
महाराष्ट्र

गंभीर..कोरोनाने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

गंभीर..कोरोनाने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

संजय महाजन

जळगाव : तिसऱ्या लाटेतील कोरोना जास्‍त घातक ठरला नसून बाधित देखील लवकर बरे होत आहेत. शिवाय मृतांचे प्रमाण देखील अत्‍यल्‍प राहिले. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाचोरा (Pachora) तालुक्यातील दाखल एका १४ वर्षीय मुलाचा कोविडने मृत्यू (Corona Death) झाल्‍याची धक्‍कादायक बाब झाली आहे. (jalgaon corona news Corona kills 14 year old boy)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ८२२ कोरोना (Corona) बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४६ हजार १३१ रूग्ण बरे होवून घरी परतले. जिल्‍ह्यात २९३ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर ४८८ बरे झाले. मात्र जळगाव तालुक्यात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तालुक्यात तब्बल ४८ नवे रुग्ण आढळून आले. तर जळगाव शहरातदेखील ४८ रुग्ण होते. अमळनेर (Amalner) तालुक्यात ३७ चाळीसगावला (Chalisgaon) ४१ नवे रुग्ण आहेत.

त्‍या मुलास अन्‍य आजार

पाचोरा तालुक्यातील एका कोरोना बाधित मुलाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ हजार ५८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे. कोरोनाने मृत झालेल्‍या मुलास इतर आजारदेखील असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

SCROLL FOR NEXT