Chalisgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Accident : मजुरांच्या गाडीला बसची धडक; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

Jalgaon News : मजुरांची हि गाडी चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळून जात असताना मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने चुकीच्या बाजूने जोरदार धडक दिली

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : पैठणकडे जाणाऱ्या मजुरांच्या गाडीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या भीषण (Accident) अपघातात कर चालकासह एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील नऊ मजूर व बसमधील नऊ प्रवासी असे १८ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

चाळीसगाव- (Chalisgaon) मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. सावतावाडी (ता. मालेगाव) येथील १० मजूर हे पैठण तालुक्यात डाळिंबाची छाटणी करण्याच्या कामासाठी गाडीने जात होते. मजुरांची हि गाडी चाळीसगाव- मालेगाव (Malegaon) रस्त्यावरील देवळी गावाजवळून जात असताना मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने चुकीच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक बसताच कारचा पुढील भाग पूर्णपणे दाबला गेला. यात चालक शेख रहेमान शेख बाबू (वय ३५, रा. अजंग, ह. मु. मालेगाव) व शरद लाखू माळी (वय ३१, रा. सावतावाडी, ता. मालेगाव) या दोघांचा मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सर्व जखमींना तत्काळ दवाखान्यात दाखल केले. या भीषण अपघातात सुनील बाळू पवार, जयवंत नारायण माळी, शंकर काशिनाथ पवार, किशोर सुकलाल सोनवणे, संदीप तुळशीराम माळी, अर्जुन देविदास पवार, भरत लाखू माळी, जयराम मोतीराम माळी, शाम रघुनाथ सोनवणे हे नऊ प्रवासी जखमी झाले. तसेच बसमधील काही प्रवाशी देखील जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासह सर्व जखमींना पुढील उपचारार्थ मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT