Nanded News : पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाई; पाणी सोडण्याची गावकऱ्यांची मागणी

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर ही सर्व गावे आहेत. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.
Nanded News
Nanded NewsSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : यंदाचा उन्हाळा दाहकता निर्माण करणारा ठरणार आहे. मुळात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. यात (Nanded) नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने ही पाणी टंचाई उद्भवली आहे. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे. (Maharashtra News)

Nanded News
Sambhajinagar Airport : संभाजीनगरमधून आता थेट सिंगापूर, बँकॉकसाठी विमान सेवा

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (Himayatnagar) तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर ही सर्व गावे आहेत. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. एकंबा गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याची टंचाई (water Crisis) भासू लागली आहे. पैनगंगा नदी काठावरील या गावांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पैनगंगा नदी कोरडी झाल्यामुळे बोर आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झालीय. शेती, जनावरांच्या आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Nanded News
Ambajogai Nagarpalika : पाणीपट्टी न भरल्याने अंबाजोगाई बिगर सिंचन योजनेचा पाणी पुरवठा बंद; ऐन उन्हाळ्यात नागरिकांना त्रास

नदीत पाणी सोडण्याची मागणी 

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता आणि यंदा असलेल्या पाणी टंचाईने पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी इसापूर धरणरून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी या नदीकाठच्या गावकऱ्यांनी केली आहे. पाणी सोडल्यानंतर किमान विहिरींना काहीसे पाणी येऊ शकेल व जनावरांची तहान भागविता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com