Chalisgaon News  Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News : चाळीसगावजवळ ५० कोटींचे ड्रग्स जप्त; महामार्ग पोलिसांची मध्यरात्री कारवाई

jalgaon News : रात्रीच्या वेळी सदरची कार दिल्लीहून बेंगळुरूकडे जात होती. महामार्ग पोलीस चौकीजवळ ही गाडी महामार्ग पोलिसांनी थांबविली. यानंतर तपासणी केली असता गाडीच्या विविध भागांमध्ये अमली पदार्थ लपवलेले आढळून आले

संजय महाजन

चाळीसगाव (जळगाव) : ड्रग्सची सर्रास तस्करी व विक्री होत असताना कारवाया झाल्या आहेत. असे असताना देखील तस्करी थांबलेली नाही. यात चाळीसगावजवळ साधारण ५० कोटींचा ३९ किलो अंँफेटामाईन ड्रग्ज जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर करण्यात आली आहे. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा परिसरात महामार्ग पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास हि मोठी कारवाई केली आहे. महामार्गावर तपासणीसाठी तैनात असलेल्या पथकाने येणाऱ्या कारला थांबवत तपासणी केली. यामध्ये साधारण ३९ किलो अंँफेटामाईन हा अत्यंत घातक अमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत ४० ते ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

कारच्या वेगवेगळ्या भागात होते ड्रग्स 

रात्रीच्या वेळी सदरची कार दिल्लीहून बेंगळुरूकडे जात होती. महामार्ग पोलीस चौकीजवळ ही गाडी महामार्ग पोलिसांनी थांबविली. यानंतर तपासणी केली असता गाडीच्या विविध भागांमध्ये अमली पदार्थ लपवलेले आढळून आले. आरोपीला ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार याआधीही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यामुळे हा रेकॉर्डेड ड्रग्ज तस्कर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता 
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. तसेच याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून माहिती दिली असून, या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? 'या' चुका आहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Ramesh Mhatre : मोठी बातमी! नगरसेवक रमेश म्हात्रेंना कोर्टाचा दणका, शरण येण्याचे आदेश

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

SCROLL FOR NEXT