JALGAON GHADEGAON GHAT ACCIDENT: THREE DEAD, THREE SERIOUSLY INJURED IN HORRIFIC CAR CRASH Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : जळगावात भीषण अपघात, अनियंत्रित कार घाटात उलटली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गाडेगाव घाट परिसरात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. वाहन अनेक वेळा पलटी झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत.

Alisha Khedekar

  • जामनेर तालुक्यातील गाडेगाव घाट परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात

  • अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी

  • वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी अनेक वेळा पलटी

  • जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले

जळगांव जामनेर तालुक्यातील गाडेगावजवळील घाट परिसरात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहनातून एकूण सहा जण प्रवास करत होते. घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर वाहन सुमारे सहा वेळा पलटी झाल्याने गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला.

अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की घटनास्थळी रक्ताचे डाग आणि वाहनाचे तुकडे विखुरलेले दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.

जखमींना त्वरित बाहेर काढून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे हलवण्यात आले. दरम्यान, मृतांची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

GST Council Meeting: अटकेची तरतूद रद्द! रिफंड, क्रेडिट लिमिटसह GST मध्ये १० मोठे बदल

मुंबई-पुणे फक्त ४८ मिनिटांत, दिल्ली-वाराणसी अवघ्या ४ तासांत...; १६ लाख कोटी...भारतीय रेल्वेनं बघितलेलं 'बुलेट' स्वप्न सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT