Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal News : पेपर अवघड गेल्याने बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : काही दिवसांपूर्वी बारावीचा पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तेव्हापासून तो नैराश्यात होता

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. दरम्यान बारावीच्या निकालानंतर अपेक्षित यश न (Bhusawal) मिळाल्याने विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असतात. मात्र भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील (Student) विद्यार्थ्याने इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने नैराश्यातून घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Breaking Marathi News)

भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे वास्तव्यास असलेला इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यंदा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काही दिवसांपासून बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरू झाली. यामध्ये इदांत मंडलेचा याने काही दिवसांपूर्वी बारावीचा पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. (jalgaon) परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तेव्हापासून तो नैराश्यात होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरी कोणी नसताना घेतला गळफास 

दरम्यान, २७ फेब्रुवारीला इदांत याने घरी कोणी नसताना पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी गणेश चौधरी तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी रविवार ठरला घातपाताचा वार; 10 जणांचा मृत्यू, पुणे-सोलापूरवर शोककळा

Government Scheme: बारावी, आयटीआय अन् डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला ₹१०,०००; सरकारची नेमकी योजना आहे तरी काय?

Fort In Kolhapur : सह्याद्रीतील छोटा पण अभेद्य ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरला गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

IPL 2026: पडलेला चेहरा, पाणावलेले डोळे...! ६ पराभवानंतर प्रीती झिंटा अय्यरमध्ये गंभीर चर्चा, डगआऊटमध्ये पाँटिंगही अस्वस्थ

Famous Singer Death : संगीत विश्वावर शोककळा; दिग्गज गायकाचे निधन, मूत्रपिंडाच्या आजाराशी सुरू होती झुंज

SCROLL FOR NEXT