Water Shortage : येवला तालूक्यात पाणी टंचाई; ६० गाववाड्यांना ३५ टँकरने पाणी पुरवठा

Nashik News : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आतापासूनच गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
Water Shortage
Water ShortageSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : यंदा मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई जनविण्यास (Water Scarcity) सुरवात झाली आहे. यामुळे पाणी पुरवठा विभागाकडून टंचाई आराखडा आतापासूनच अमलात आणण्यास सुरवात झाली आहे. या दरम्यान (Nashik) नाशिकच्या येवला तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागल्याने ६० गणवाड्यांवर ट्रँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. (Live Marathi News)

Water Shortage
Shelu Bajar Samiti : गहू, हरभरा विक्रीसाठी गर्दी; शेलू उपबाजार समितीसमोर वाहनांच्या रांगा

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) झाला. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आतापासूनच गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यानुसार नाशिकच्या येवला तालूक्यातील उत्तरपूर्व भागातील विहिरींसह कूपनलिका फेब्रुवारी महिन्यात कोरड्याठाक पडल्या असून,अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांच्या (Water Crisis) पाणी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामिण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Shortage
Mahavitaran Bill : बुलढाणा शासकीय विश्रामगृहाचा विद्युत पुरवठा केला खंडित; १३ लाखाचे बिल थकविल्याने महावितरणची कारवाई

फेब्रुवारीतच ट्रँकर सुरु 

पाणी टंचाई जाणवू लागल्याने फेब्रुवारी महिन्यातच ६० गाव-वाड्यावस्त्यांना सध्या ३५ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान तीव्र उन्हाळ्याचे तीन महिने बाकी असून आगामी काळात पाण्याची परिस्थिती अधिक भयावह होऊन टँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com