Shelu Bajar Samiti : गहू, हरभरा विक्रीसाठी गर्दी; शेलू उपबाजार समितीसमोर वाहनांच्या रांगा

Washim News : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणी केलेल्या गव्हावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Shelu Bajar Samiti
Shelu Bajar SamitiSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : रब्बी हंगामातील हागू, हरभरा, ज्वारी काढणीला सुरवात झाली आहे. तसेच तूर काढणी देखील आटोपली असून भाव चांगले मिळतील अशी (Farmer) शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे भावावर परिणाम होईल; यासाठी शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा विक्रीसाठी आणला आहे. यामुळे (Bajar Samiti) बाजार समितीसमोर रांगा लागल्या आहेत. (Tajya Batmya)

Shelu Bajar Samiti
Beed Politics: मनसेचं ठरलं! बीडसह परळी विधानसभा निवडणूक लढवणार; जिल्हाध्यक्षांची माहिती

वाशिम (Washim) जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणी केलेल्या गव्हावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी गव्हाच्या विक्रीची तसेच हरभरा, तूर पिकाच्या विक्रीसाठी बाजार समितीमध्ये धाव घेतल्याने वाशिम जिल्ह्यातील (Selu) शेलुबाजार येथील उपबाजार समितीच्या समोर अकोला- आर्णी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shelu Bajar Samiti
Barvi Dam : बारवी धारण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा; ठाण्यात करणार धरणे आंदोलन

तर दुसरीकडे बाजार समितीत जसा पाहिजे, तसा शेत मालाला दरही मिळत नाही. कालच्या अवकाळी पाऊसमुळे हा शेतमाल ठेवायचा कुठे? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. यामुळे शेतकरी आपला माल विक्रीकरिता मार्केटमध्ये आणत आहे. येथे आणल्यानंतर मिळेल त्या भावात माळ विक्री करत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com