Mahavitaran Bill : बुलढाणा शासकीय विश्रामगृहाचा विद्युत पुरवठा केला खंडित; १३ लाखाचे बिल थकविल्याने महावितरणची कारवाई

Buldhana News : बुलढाणा शासकीय विश्रामगृह हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे बुलढाण्यात मंत्र्यांसह इतर राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत.
Mahavitaran Bill
Mahavitaran BillSaam tv
Published On

बुलढाणा : मार्च एंडिंग जवळ येत असल्याने थकीत बिलाची वसुली करण्याचे काम महावितरणकडून (Mahavitaran) केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून वीज बिल थकविणाऱ्यांवर कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यानुसार (Buldhana) बुलढाणा जिल्हा मुख्यालयी असलेले शासकीय विश्रामगृहाचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे.  (Maharashtra News)

Mahavitaran Bill
Barvi Dam : बारवी धारण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा; ठाण्यात करणार धरणे आंदोलन

बुलढाणा शासकीय विश्रामगृह हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) ताब्यात आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे बुलढाण्यात मंत्र्यांसह इतर राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. (MSEDCL) अशातच शासकीय विश्रामगृह अंधारात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय पावलं उचलत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavitaran Bill
Shelu Bajar Samiti : गहू, हरभरा विक्रीसाठी गर्दी; शेलू उपबाजार समितीसमोर वाहनांच्या रांगा

१३ लाख थकविले 

विश्राम गृहात दोन विद्युत कनेक्शन आहेत. मात्र गेल्या ६ महिन्यापासून दोन्ही कनेक्शनचे १३ लाख रुपये विज बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने भरलेले नाही. यामुळे शासकीय विश्रामगृहाचा संपूर्ण विद्युत पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com