Buldhana News : दुचाकीवरील दोघांना शिवीगाळ करत मारहाण; एकजण गंभीर जखमी, बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने वाद

Malkapur News : बुलढाणा शहरातील मलकापूर शहरात राँग साईडने बुलेट चालवत असताना प्रकाश पठ्ठे आणि अमोल पठ्ठे यांच्या दुचाकीला बुलेटने मागून धक्का दिला.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : दुचाकीला मागून धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दुचाकीवरील दोघांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार मलकापूर (Malkapur) शहरात घडला. विशेष म्हणजे पोलिसांसमोर मारहाण झाली असून याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. (Tajya Batmya

Buldhana News
Zilla Parishad : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित, अन्यथा कारवाई हाेणार

बुलढाणा (Buldhana) शहरातील मलकापूर शहरात राँग साईडने बुलेट चालवत असताना प्रकाश पठ्ठे आणि अमोल पठ्ठे यांच्या दुचाकीला बुलेटने मागून धक्का दिला. दुचाकीला धक्का लागल्याने माझ्या दुचाकीला धक्का का दिला? असे म्हटल्यावर वाद निर्माण झाला. या दरम्यान बुलेटवरील दिग्विजयसिंह राजपूत, सतेंद्रसिह राजपूत, प्रतिकसिंह राजपूत यांनी प्रकाश पठ्ठे आणि अमोल पढे यांना अश्लील शिवीगाळ करुन जबर (Crime News) मारहाण केली. यामध्ये ते दोघेही जखमी झाले असून यातील प्रकाश पठ्ठे याला डोक्यावर विट मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी बुलडाणा येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana News
Lasalgaon Crime : तीन तोळ्याची सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकांच्या सतर्कतेने चोरटा अडकला 

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल 

घटनेतील मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी घटनास्थळावर पोलिस (Police) कर्मचारी सुद्धा असल्याचे दिसून येत आहे. मात्र हाणामारी एवढी होती की कोणी कोणाचे ऐकायला तयार नव्हते. नागरिक फक्त बघ्यांची भूमिका घेत उभे होते. याप्रकरणी दिग्विजयसिंह राजपूत, सतेंद्रसिह राजपूत, प्रतिकसिंह राजपूत यांच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com