Mahavitaran Bill : सव्वा दोन लाख वीज ग्राहकांकडे महावितरणचे घेणे; तब्बल ३८८ कोटींची थकबाकी

Parbhani News : महावितरणकडून वीज वापराच्या मोबदल्यात दर महिन्याला वीज बिलाची आकारणी केली जात असता. मात्र काही वीज ग्राहकांकडूनच नियमित बिलाचा भरणा केला जात असतो.
Mahavitaran Bill
Mahavitaran BillSaam tv
Published On

परभणी : महावितरणकडून अधिकृत कनेक्शन घेऊन विजेचा वापर केला जातो. मात्र या वीज वापरेचा मोबदला म्हणून (Mahavitaran) महावितरणकडून दर महिन्याला दिले जाणारे वीज बिलाचा भरणा ग्राहकांकडून केला (Electric Bill) जात नाही. यामुळे परभणी जिल्ह्यात सव्वादोन लाख वीज ग्राहकांकडे तब्बल ३८८ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. (Live Marathi News)

Mahavitaran Bill
Buldhana News : दुचाकीवरील दोघांना शिवीगाळ करत मारहाण; एकजण गंभीर जखमी, बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने वाद

महावितरणकडून वीज वापराच्या मोबदल्यात दर महिन्याला वीज बिलाची आकारणी केली जात असता. मात्र काही वीज ग्राहकांकडूनच नियमित बिलाचा भरणा केला जात असतो. मात्र दुसरीकडे वसुलीसाठी हवे तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. (MSEDCL) परिणामी थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे. थकबाकीदार ग्राहकांमुळे नियमित बिल भरणाऱ्या वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavitaran Bill
Electric Shock : डोळ्यादेखत मुलाचा जीव गेला; मोटार लावताना विजेचा झटका

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरगुती व इतर वीज ग्राहकांकडे ३९९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरण विभाग आर्थिक अडचणीत सापडला आहे. थकबाकीत परभणी जिल्हा हा विभागात प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ९८ हजार कृषीपंप धारकांकडे १३०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com