Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

Jalgaon Accident : ट्रॅकची दुचाकीला धडक; दोन जण जागीच ठार

jalgaon News : अपघात झाल्यानंतर दुचाकी ट्रकच्या समोरील दोन्ही चाकांच्या मधोमध अडकली. तरी देखील ट्रकचालकाने ट्रक न थांबविता तब्बल दुचाकी चौदा किलोमीटर ओढून नेली.
Published on

भुसावळ (जळगाव) : जळगावकडे जाणाऱ्या दुचाकीस भरधाव ट्रॅकने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) दोघांना चिरडून तब्बल चौदा किलोमीटर दुचाकी ओढत नेल्याची घटना १५ फेब्रुवारीला (Jalgaon) सायंकाळी घडली. या घटनेत दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला, (Tajya Batmya)

Jalgaon Accident
Beed News : बीड- लातूर महामार्ग रोखला; मराठा समाज बांधवांकडून आंदोलन

जळगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस भरधाव ट्रकने मागील बाजूस धडक देऊन दुचाकीस्वार जितेंद्र राठोड (वय ४०) तर याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला ट्रकचालकाने चिरडले. मृत झालेल्या दोघांना (Bhusawal) राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिकेमधून ट्रामा केअर सेंटरमध्ये विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Accident
Maratha Aarkshan : मराठा आंदोलकांनी महामंडळाची बस पेटवली; हिंगोली- नांदेड मार्गावरील घटना

टोलनाक्यावर पोलिसांनी रोखले 

अपघात झाल्यानंतर दुचाकी ट्रकच्या समोरील दोन्ही चाकांच्या मधोमध अडकली. तरी देखील ट्रकचालकाने ट्रक न थांबविता तब्बल दुचाकी चौदा किलोमीटर ओढून नेली. नशिराबाद टोलनाक्याजवळ पोलिसांनी ट्रक थांबवून ट्रकचालक व किन्नर या दोघांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com