Jalgaon News : महावितरणच्या अधिकाऱ्यांना कुलूप लावून कोंडले कार्यालयात; वीज पुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक

Jalgaon News : आदिवासी बहुल गावपाड्यावर वीजपुरवठा सुरळीत मिळत नाही, जो मिळतो तो ही कमी दाबाचा असतो. त्यामुळे शेती पिकांना पाणी मिळत नाही,
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील उमर्टी, गौऱ्यापाडा, अमलवाडी, मोरचिडा, सत्रासेन या गावात (Jalgaon) वीज पुरवठा सुरळीत होत नाही. शिवाय शेती पिकांचे देखील नुकसान होत आहे. याबाबत महावितरणला लेखी, तोंडी निवेदन देण्यात आले होते. मात्र काही उपयोग होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या (Mahavitaran) अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून बाहेरून कुलूप लावले. (Live Marathi News)

Jalgaon News
Jalgaon News : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात हे ताळेबंद आंदोलन करण्यात आले, चोपडा (Chopda) शहरातील जुना शिरपूर रोडवरील (MSEDCl) लासूर फिडरच्या कार्यालयावर १४ फेब्रुवारीला सकाळी अकराला डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात टाळेबंद आंदोलन करण्यात आले. आदिवासी बहुल गावपाड्यावर वीजपुरवठा सुरळीत मिळत नाही, जो मिळतो तो ही कमी दाबाचा असतो. त्यामुळे शेती पिकांना पाणी मिळत नाही, पाण्याअभावी पिके जळत असून, आम्ही करावे काय? असा प्रश्न यावेळी वीज मंडळाचे अधिकारी यांना विचारण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon News
Rahuri Crime : जबरी चोरी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; कृषी केंद्रातून लांबविली होती ३४ हजाराची रोकड

चार तास ठेवले डांबून 

महावितरणच्या अधिकारींना चार तास कार्यालयास टाळे ठोकून कोंडून ठेवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित साबळे आणि कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी आंदोलनकर्ते, अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. डॉ. बारेला यांनी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देत या दरम्यान आमची समस्या न सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com