Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : महाशिवरात्रीच्या तोंडावर पुरातन महादेव मंदिरात चोरी; पिंडीवरील सोन्याच्या पत्र्यासह त्रिशूल नेला काढून

Jalgaon News : पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन मंदिरातील तांबे पितळाच्या सुमारे ८० हजारांच्या वस्तू चोरुन नेल्या

संजय महाजन

जळगाव : मंदिर देखील आता सुरक्षित राहिले नसल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. दोन दिवसांवर महाशिवरात्री आली असताना पुरातन महादेव मंदिरात चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथे महादेव मंदिरातील पिंडीवरील सोन्याचा पत्रा यासह त्रिशूल व पितळी नाग घेऊन चोरटा फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील भडगावच्या कजगाव येथील वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी भागात पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन मंदिरातील तांबे पितळाच्या सुमारे ८० हजारांच्या वस्तू चोरुन नेल्या. चोरटे गावांमध्ये फिरत टेहळणी करत असतात. बंद घरांमध्ये चोरी करण्यासोबतच गावातील मंदिरांमध्ये देखील चोरी करत आहेत. यामुळे मंदिरातील देव देखील सुरक्षित नसल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. 

महाशिवरात्रीची तयारी 

येत्या २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. यामुळे शिव मंदिरात याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यानुसार कजगाव येथील पुरातन मंदिरात देखील महाशिवरात्रीचे नियोजन करण्यात आले होते. यापूर्वीच या पुरातन महादेव मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी भाविक दर्शन घेण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर संपूर्ण गावात चोरी झाल्याची बातमी पसरली. 

पिंडीवरील पत्रा, नाग, त्रिशूल नेला चोरून  

भल्या पहाटे देवळात चोरट्याने प्रवेश करत महादेवाच्या पिंडीवरील वस्तू चोरून नेल्या आहेत. महाशिवरात्री पूर्वीच या महादेवाच्या पिंडीवरील साज पितळी नाग, पिंडीवरील सोन्याचे कवच आणि त्रिशूल असा ७० ते ८० हजारांच्या विविध वस्तू चोरुन नेल्याची घटना पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली असून चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी भडगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT