Kasara Ghat : कसारा घाट आजपासून बंद; मुंबई- नाशिक महामार्गांवरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

Shahapur News : पावसाळ्याच्या पूर्व तयारीसाठी व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाट बंद करण्यात आला आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील आठ दिवस वाहतूक बंदची घोषणा करण्यात आली आहे
Kasara Ghat
Kasara GhatSaam tv
Published On

फैय्याज शेख 

शहापूर : मुंबई- नाशिक महामार्गांवरील कसारा घाट आजपासून आठ दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच्या कालावधीत या महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे यावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून नवीन घाट रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पूर्व तयारीसाठी व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाट बंद करण्यात आला आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील आठ दिवस वाहतूक बंदची घोषणा करण्यात आली आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

Kasara Ghat
Sangli Police : सांगलीत नवं स्कॅम, नशेच्या गोळ्यांची मेडिकलमधून चोरी, वाढीव दराने विक्री, पोलिसांनी टोळीला शिकवला धडा

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी निर्णय 

२४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तसेच ३ मार्च ते ६ मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात आली आहे. आजपासून जुन्या कसारा घाटातील दुरूस्तीला सुरवात केल्याने जुना कसारा घाट पुर्णपणे बंद करण्यात आले आहे. नवीन कसारा घाटात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून सर्व ती काळजी घेतली जात आहे.

Kasara Ghat
Sambhajinagar Water Shortage : उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकर वाढले; संभाजीनगर शहरात बिकट अवस्था

अवजड वाहनांना पूर्णतः बंदी 
दरम्यान महामार्गावरील कसारा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून आजपासून मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली आहे. या मार्गावर अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून ओडिसीसारखी अवजड वाहने मुंबई- पुणे एक्सप्रेस वे च्या मार्गे वळविण्यात आली आहे. महामार्ग पोलीस केंद्र, कसारा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम व महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी येथे दाखल झाले असून जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com