Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : फवारणी करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : गौरव हा धुळे येथे ‘बीसीए’चे शिक्षण घेत होता व सुट्टीवर घरी आलेला असता ही दुर्दैवी घटना घडली. शेतात वडिलांना मदत म्हणून गौरव हा फवारणीच्या कामासाठी गेला होता

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : पावसाने उघडीप दिल्याने आता शेती कामाला वेग आला आहे. यात शेतात फवारणी करत असताना विहिरीत टाकलेल्या मोटारीच्या वायरला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना अमळनेर तालुक्यातील वावडे या गावशिवारात ३१ जुलैला दुपारच्या सुमारास घडली.

अमळनेर (Amalner) तालुक्यातील वावडे गावातील गौरव दीपक माळी (वय २०) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. गौरव हा धुळे येथे ‘बीसीए’चे शिक्षण घेत होता व सुट्टीवर घरी आलेला असता ही दुर्दैवी घटना घडली. शेतात वडिलांना मदत म्हणून गौरव हा फवारणीच्या कामासाठी गेला होता. फवारणी करताना विहिरीवर लावलेल्या मोटारच्या वायरचा स्पर्श त्याच्या मानेला झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का (Electric Shock) बसला. पावसामुळे जमीन देखील ओली असल्याने विद्युत प्रवाह संपूर्ण शरीरात गेला. 

घटना घडली यावेळी त्याचे वडील देखील शेतातच होते. घटनेनंतर त्याचे वडील व गावातील लोकांनी त्याला उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT