Milk business Bhagyashree accident Saam Tv News
महाराष्ट्र

Jalgaon Accident : वडिलांच्या अपघातानंतर दुग्ध व्यवसायात हातभार, पण भाग्यश्रीला काळानं गाठलं; अपघातात करुण अंत

Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जानवे येथील वडिलांना दूध व्यवसायात मदत करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीचा सोमवारी १२ मे रोजी रात्री साडे आठवाजेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे.

Prashant Patil

जळगाव : जळगाव तालुक्यातील जानवे येथील वडिलांना दूध व्यवसायात मदत करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीचा सोमवारी १२ मे रोजी रात्री साडे आठवाजेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना अमळनेर-धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्याजवळ घडली. भाग्यश्री दीपक पाटील असं सदर तरुणीचं नाव होतं.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वीच मोटारसायकलवरून घसरून दीपक पाटील यांचा अपघात झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मोटारसायकल चालवू नये, असा सल्ला दिला होता. त्यामुळे दीपक पाटील यांची मुलगी भाग्यश्री ही त्यांना दूध व्यवसायासाठी मदत करत होती. नेहमीप्रमाणे भाग्यश्री सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक - एम एच १९ ,ई बी ६०२७ वर दुधाचे कॅन घेऊन अमळनेर इथे येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनानं कट मारल्यानं मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात मोटारसायलवरून खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता. भूषण पाटील यांनी जानवे गावात माहिती कळवल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखान्यात नेलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

भाग्यश्री पाटील ही तरुणी एकीकडे शिक्षण पूर्ण करत असताना दुसरीकडे आपल्या वडिलांना दुग्ध व्यवसायात हातभार लावत होती. मोटारसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर हा तिचा नित्यक्रम झाला होता. सुरुवातीला वडिलांसोबत संकलन केलेल्या दुधाचे ती वाटप करत असत. त्यानंतर हळूहळू भाग्यश्रीने धाडस करत मोटारसायकलवर दूध घेऊन जाणं सुरू केलं. यामुळे तिच्या वडिलांना तिची चांगलीच मदत होत होती. शिवाय तिच्या मदतीमुळे दूध व्यवसायात भरभराट देखील झाली होती. मात्र आता तिचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT