Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: डोळ्यादेखत आईचा मृत्यू; उपचारादरम्‍यान मुलानेही मिटले डोळे

डोळ्यादेखत आईचा मृत्यू; उपचारादरम्‍यान मुलानेही मिटले डोळे

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (३ जानेवारी) दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात मुलाच्या दुचाकीवर बसलेली आई अंगावरून ट्रक गेल्याने जागीच ठार झाली होती. त्यांचा गंभीर जखमी मुलगा कामील याचाही बुधवारी (ता. ४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Tajya Batmya)

जळगाव (Jalgaon) शहरातील समतानगरमधील रहिवासी अल्ताफ बेग यांच्या पत्नी जुबेदाबी मुलगा कामील बेग (वय २०) सावदा येथून साखरपुडा आटोपून दुचाकीने जळगावला येत होता. नशिराबादजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्‍वाराने कामील बेग याच्या दुचाकीला (Accident) धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले. तर कामीलची आई जुबेदाबी यांच्या अंगावरून सुसाट ट्रक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.

अखेर प्राणज्योत मालवली

गंभीर जखमी कामील बेग याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी कामील बेग याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच कुटुंब व नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री आठला कामील बेग याचा मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

Farm Benefits For Wife : पती-पत्नीच्या नावे शेती असल्यास, आता फक्त पत्नीलाच मिळणार लाभ | VIDEO

SCROLL FOR NEXT