Jalgaon News: गार वाऱ्याने हुडहुडी वाढली; थंडीची लाट तीन-चार दिवस

गार वाऱ्याने हुडहुडी वाढली; दिवसभर ढगाळ वातावरण
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : उत्तर प्रदेशात थंडीची लाट आली आहे. त्यासोबतच अतिथंड वारे तीव्र वेगाने वाहत आहे. याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही दिसून आला आहे. १ जानेवारीपर्यंत थंडी हलकशी होती. मात्र, मंगळवारपासून अतिथंड वारे सुरू झाल्याने थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. तीन दिवस ही लाट कायम राहणार असल्‍याचा अंदाज वर्तविला आहे. (Letest Marathi News)

Jalgaon News
Belgaum Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जण ठार

सकाळी सर्वत्र दाट धुकेही होते. सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले नाही. स्वेटर, मफलर, जॅकेट सर्वच जण वापरताना दिसून आले. थंडीपासून बचावासाठी काही ठिकाणी शेकोट्या पेटविल्या गेल्या. दिवसभर चहाला मोठी मागणी होती.

९.५ अंशावर तापमान

मंगळवारी रात्रीपासूनच गार वारे वाहत असल्याने थंडी जाणवू लागली. यामुळे जळगाव (Jalgaon) शहरात बुधवारी सकाळी तापमान ९.५ अंश सेल्सिअस होते. तर रात्रीचे तापमान अधिकच खाली आले होते. मकरसंक्रांतीपर्यंत थंडीचा जोर वाढत जाईल. नंतर मात्र ती कमी कमी होत जाईल, असे हवामान अभ्यासक सांगतात.

थंडीची लाट तीन-चार दिवस राहणार

जिल्ह्यात सुरू झालेली थंडीची लाट तीन ते चार दिवस राहील; असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सात जानेवारीपर्यंत कमीत कमी तापमान ९ ते ११ अंशांदरम्यान दरम्यान असेल. त्यानंतर मात्र अकरा ते पंधरा दरम्यान राहील. अधिक तापमान २४ ते २५ अंशावर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com