Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident News : मुलीला सीईटी परीक्षेसाठी घेऊन गेलेल्या पित्यावर काळाचा घाला; मुलीसह एकजण जखमी

Jalgaon News : १० एप्रिलला त्यांची मुलगी नैना हिची एमबीए- सीईटीची परीक्षा होती. अमळनेर येथे सेंटर आल्याने मुलगी आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६) यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते

Rajesh Sonwane

जळगाव : मुलीची एमबीए- सीईटीची परीक्षा असल्याने वडील तिला घेऊन अमळनेरला गेले होते. पेपर संपल्यानंतर घरी येण्यासाठी रवाना झाले होते. धरणगावपासून पुढे आल्यानंतर त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुलीसह अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहे. सदरचा अपघात धरणगाव- जळगाव दरम्यान महामार्गावरील पिंप्री गावाजवळ घडला आहे. 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी महेश सुरेश सोनार (वय ५५) असे मृत्यू झालेल्यां व्यक्तीचे नाव आहे. महेश सोनार हे पत्नी आणि दोन मुलींसोबत राहात होते. त्यांचा पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय होता. दरम्यान १० एप्रिलला त्यांची मुलगी नैना हिची एमबीए- सीईटीची परीक्षा होती. अमळनेर येथे सेंटर आल्याने मुलगी आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६) यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते. 

पेपर देऊन परतताना अपघात 

दरम्यान दुपारी परीक्षा संपल्यानंतर अमळनेरहून जळगावकडे परत येण्यासाठी निघाले. धरणगावच्या पुढे दुपारी दीडच्या सुमारास पिंप्री गावाजवळ आले असताना त्यांच्या कारला समोरून आलेल्या एका बोलेरोने जोरदार धडक दिली. त्यात महेश सोनार यांचा मृत्यू झाला. तर मुलगी नैना आणि सोबत असलेले राजेश धूत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी जळगाव येथे आणण्यात आले आहे. 


हळदीसाठी जात होते वऱ्हाड 
दरम्यान कारला धडक देणारे समोरच्या वाहनात भोद गावातील लग्नातील वऱ्हाड होते. हळदीचा कार्यक्रम असल्याने नववधू देखील या गाडीमध्ये होती. या अपघातात बोलेरोमधील काही जणही जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT