Hingoli Police : दोन वर्षात एकही गुन्हा दाखल नाही; पोलिसांच्या रजिस्टरमधून गुन्हेगारांची नावे कमी

Hingoli news : हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हाभरात गुन्हेगारी सोडून समाज सेवेकडे वळलेल्या लोकांना पोलिसांचा नाहक त्रास होऊ नये; यासाठी विशेष मोहीम राबवली होती.
Hingoli Police
Hingoli PoliceSaam tv
Published On

हिंगोली : साधारण दहा वर्षांपूर्वी गुन्हेगारी माजविणाऱ्यांची नावे पोलिसांनी गुंडा रजिस्टर मधून कमी करण्यात आली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेचे हे फलित आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांना दिलासा मिळाल्याचे चित्र हिंगोली जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. मागील दोन वर्षात एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे रेकॉर्ड मधून उघड झाल्याने पोलिसांनी नावे कमी केली आहेत. 

हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या रेकॉर्डवर असलेल्या अनेक गुन्हेगारांची नावे गुंडा रजिस्टर मधून पोलीस दलाने कमी केली आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हाभरात गुन्हेगारी सोडून समाज सेवेकडे वळलेल्या लोकांना पोलिसांचा नाहक त्रास होऊ नये; यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेला चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. 

Hingoli Police
Pune Crime : मेहुणीसोबत अनैतिक संबंध, घरच्यांचा विरोध, रात्री एकठ्यात धरलं; पुण्यात इस्टेट एजंटला संपवलं

गुन्हा दाखल न झालेल्यांची नवे कमी 

पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेत न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या आणि मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात एकही गुन्हा दाखल न झालेल्या गुन्हेगारांची नावे पोलिसांच्या गुंडा रजिस्टर मधून कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील ठाणेदारांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेऊन ही नावे कमी करत गुन्हेगारी कमी केलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. 

Hingoli Police
Bogus Cotton Seeds : ५० लाखांचे कपाशीचे बोगस बियाणे जप्त; एकजण ताब्यात, वर्धा कृषी विभागाची कारवाई

यवतमाळात देशी कट्टे जप्त
यवतमाळच्या लोहारा येथील सराईत आरोपींना तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर ते पोलिसांना चकमा देऊन लोहारा परिसरात फिरत होते. याची गोपनिय माहिती मिळताच रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींच्या हालचालीवर पाळत ठेवली. संधी मिळताच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींकडून दोन देशी कट्टे व दोन जिवंत काडतूस पोलिसांच्या हाती लागले.  दीपक उर्फ भैया यादव राहणार लोहारा आणि प्रफुल उर्फ पप्प्या रावेकर राहणार इंदिरानगर यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com