Shirdi Sai mandir : साई मंदिरात हार, फुल, प्रसाद नेण्यास बंदी; युद्धाच्या पार्श्वभूमीवर आजपासून अंमलबजावणी

Shirdi News : काही दिवसांपूर्वी आलेला धमकीचा मेल आणि आता भारत व पाकिस्तानमध्ये असलेले तणावाचे वातावरण यामुळे मंदिरातील सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त करण्यात आला आहे प्रवेशद्वारावरच भाविकांची तपासणी
Shirdi Sai mandir
Shirdi Sai mandirSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आल्यानंतर साई संस्थान अलर्ट झाले आहे. तर सद्यस्थितीला भारत- पाकिस्तान युद्ध सुरु असल्याने शिर्डी साई संस्थानकडून कडक तपासणी केली जात आहे. तर आता दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मंदिरात हार, फुल आणि प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली आहे. याची अंमलबजाणी आजपासुन सुरु करण्यात आली आहे

शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी हजारोच्या संख्येने रोज भाविक येत असतात. अशा ठिकाणी सुरक्षिततेची दखल घेतली जात असते. अशातच काही दिवसांपूर्वी आलेला धमकीचा मेल आणि आता भारत व पाकिस्तानमध्ये असलेले तणावाचे वातावरण यामुळे मंदिरातील सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रवेशद्वारावरच भाविकांची तपासणी करण्यात येत आहे.

Shirdi Sai mandir
Bogus Cotton Seeds : ५० लाखांचे कपाशीचे बोगस बियाणे जप्त; एकजण ताब्यात, वर्धा कृषी विभागाची कारवाई

मंदिरात हार, फुल, प्रसाद नेण्यास बंदी

दरम्यान भारत- पाकिस्तान तणाव आणि साई संस्थानला आलेल्या धमकीच्या मेलनंतर साई संस्थानने काही कडक निर्णय घेतले आहेत. यामध्ये साई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी कडक तपासणी करण्यात येत आहे. तर आता मंदिरात भाविकांना हार, फुल व प्रसाद नेण्यास बंदी करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

Shirdi Sai mandir
Hingoli Police : दोन वर्षात एकही गुन्हा दाखल नाही; पोलिसांच्या रजिस्टरमधून गुन्हेगारांची नावे कमी

होतेय कडक तपासणी 
सुरक्षेच्या दृष्टीने साई संस्थान अलर्ट झाले आहे. दरम्यान आजपासुन निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात आल्याने सकाळपासून येणाऱ्या भाविकांजवळीत फुल, हार व प्रसाद जमा केला जात आहे. पुढील आदेशापर्यंत भाविकांना मंदिरात हार, फुल, प्रसाद नेता येणार नाही. यासह भाविकांकडील कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण समाधी मंदिरात जाणार नाही; याची दक्षता घेतली जात आहे. यात काही भाविक संस्थांमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com