Jalgaon Accident News 2 Killed Saam
महाराष्ट्र

लग्न आटपून घरी परतताना भीषण अपघात! सिमेंट मिक्सर अन् रिक्षाची धडक; २ जणांचा जागीच मृत्यू, ७ जखमी

Jalgaon Accident News 2 Killed: जळगावच्या जामनेर तालुक्यात गारखेडा येथे प्रवासी वाहतूक रिक्षा आणि रस्त्याचे काम करणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात झाला. दोन व्यक्तींचा अपघातात मृत्यू.

Bhagyashree Kamble

जळगावच्या जामनेर तालुक्यातील गारखेडा येथून भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. प्रवासी वाहतूक रिक्षा आणि सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता गोपाळ निंबाळकर (वय वर्ष २१) असे मयत तरूणीचे नाव आहे. तर, श्रीराम गुरु भैया (वय वर्ष ३२) असे दुसऱ्या मयत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात मृत झालेल्या निकिता निंबाळकर हिचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

रिक्षामध्ये काही प्रवासी प्रवास करीत होते. घटनेच्या दिवशी भरधाव रिक्षा आणि सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर बचावकार्याला सुरूवात झाली.

मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. तसेच सर्व जखमींना तातडीने प्राथमिक उपचार नंतर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. निंबाळकर कुटुंब भुसावळ येथे लग्नकार्य आटपून जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे परतत होते. या दरम्यान गारखेडा गावाजवळ समोरून येणाऱ्या रस्त्याचे काम करणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाची धडक झाल्याने भीषण अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Hair Fall: दररोज घरीच 'हे' 5 योगा करा, केसगळती कायमची होईल दूर

Mumbai local crowd : रेल्वे प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार? खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update : विदर्भाची काशी देव मार्कंडा येथे महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांची गर्दी

Pune: जमिनीच्या वादातून कुटुंबात तुंबळ हाणामारी, महिलांनाही सोडलं नाही; पाहा VIDEO

Accident: भाजप खासदाराच्या धावत्या कारला भीषण आग, त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी निघाले असता वाटेत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT