ओबीसी आरक्षणाला (OBJ Reservation) धक्का लागणार नाही याचे सरकारने लेखी आश्वासन द्यावे या मागणीसाठी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सरकारचा निषेध म्हणून आजपासून पाण्याचा त्याग केलाय. सरकार वंचित घटकांची जराही दखल घेत नाही, असा आरोप लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी यावेळी केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडून पाण्याचा त्याग करण्यात आला आहे. शासनाचा निषेध म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आजपासून पाणी सोडलं आहे. सरकार कडून दखल घेतली जात नाही तोपर्यंत उपोषणात आजपासून पाणी देखील घेणार नाही, असा इशारा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सरकारला दिला आहे.
अशामध्ये ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती बिघडली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला आहे. डॉक्टरांच्या पथकाने आज त्यांची तपासणी देखील केली. दोघांच्याही काही टेस्ट आणि आणि एक्सपर्ट डॉक्टरांची ओपिनियन आवश्यक असल्याचे मत या डॉक्टरांनी व्यक्त केले होते.
कायद्याला धरून नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगावे असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले होते. तर नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना ओबीसी, एससटी आणि एसटी समाजाचा द्वेष आहे का?, असा सवाल केला आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी लेखी लिहून द्यावे या मागणीसाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.