Laxman Hake Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake Video: सर्वात मोठी बातमी! १० दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; शिष्टमंडळाच्या भेटीनंतर घोषणा

Laxman Hake Hunger Strike Protest: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले होते. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, जालना|ता. २२ जून २०२४

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. या शिष्टमंडाळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. सरकार आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे आमचे उपोषण आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत, असे हाके यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

"आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे आमचे उपोषण आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत, अशी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली. तसेच मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला. हे आंदोलन फक्त स्थगित केले आहे, थांबवले नाही, असेही ते पुढे म्हणाले.

"छगन भुजबळ यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. ज्यामध्ये त्यांनी दोन मुद्दे जवळ- जवळ मान्य केल्याचे सांगितले आहे. मात्र सगेसोयऱ्यांचा अध्यादेशाबाबतचा निर्णय टेक्निकल आहे. तो अध्यादेश काढण्याअगोदर सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, मग त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल," असे लक्ष्मण हाके म्हणाले.

तसेच "बोगस कुणबी नोंदी देणारे आणि घेणाऱ्यांवर कारवाई होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शासनचं कुणबी नोंदी वाटत आहे, त्यामुळे या प्रश्नाबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. छगन भुजबळ आणि शिष्टमंडळावर विश्वास होता, म्हणूनच आम्ही त्यांना चर्चेसाठी पाठवले. ते ओबीसी हिताचा जो निर्णय घेतील त्यावर आम्ही चर्चा करु," असेही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Dress For Christmas: ख्रिसमस पार्टीसाठी रेड ड्रेसचे 5 लेटेस्ट पॅटर्न; तुम्ही दिसाल एकदम कडक

Maharashtra Live News Update: मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

Smartphone: तुमच्या मोबाइलचं नेटवर्क सारखं गायब होतंय...या सोप्या ट्रिक वापरा

Pradnya satav : काँग्रेसला रामराम का केला? भाजपमध्ये प्रवेश करताचा प्रज्ञा सातव म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT