आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करणं हा राज्य शासनाचा बहुमान- अमित देशमुख
आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करणं हा राज्य शासनाचा बहुमान- अमित देशमुख Saam Tv
महाराष्ट्र

आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करणं हा राज्य शासनाचा बहुमान- अमित देशमुख

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची राज्य सरकारने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमान आहे असं वक्तव्य राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले. यावरती ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा माझ्यासाठी घरच्यांकडून झालेले कौतुक आहे अशा शब्दांमध्ये आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.It is an honor for the state government to announce 'Maharashtra Bhushan' award to Asha Bhosle

राज्य शासनाचा 2021 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ 'Maharashtra Bhushan'पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुखAmit Deshmukh यांनी आशा भोसले यांच्या लोअरपरळ येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदनCongratulations केले. यावेळी संगीतकार राहुल रानडेही उपस्थित होते.

अमित देशमुखांनी यावेळी आशा भोसले यांना पुष्पगुच्छ दिला तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णयही कळवला तसेच आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ पुस्तक, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’Lokrajya भेट देण्यात आले.

भारतरत्न लतादीदी आणि आशा भोसले या संगीतातील एक दैवी शक्ती आहेत, आणि त्यामुळेच आशा भोसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली असल्याच देशमुखांनी यावेळी सांगितलं. राज्य शासन महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून यासाठी संगीतातले दिग्गजांची मदत घेतली जाणार असल्याचेही देशमुखांनी सांगितलं.

महाराष्ट्रभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,Cm Uddhav thackeray उपाध्यक्ष अजितदादा पवार,DCM Ajit PAwar सदस्य सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर, विभागाचे सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालकांसह समितीचे सदस्य डॉ. अनिल काकोडकर, प्रकाश आमटे,Prakash Amate बाबा कल्याणी, संदीप पाटील, दिलीप प्रभावळकर यांचे अमित देशमुखांनी आभार मानले आहे.

दरम्यान, मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, त्यासाठी मी सर्वांची आभारी आहेच. मात्र महाराष्ट्र भूषण हा वेगळा पुरस्कार आहे. हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. तसेच हा पुरस्कार जाहीर होणं म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाल्याच मी समजते अशा भावना श्रीमती आशा भोसले यांनी यावेळी मांडल्या. तसेच या पुरस्कारासाठी मी राज्य सरकारची आभारी आहे असं म्हणून त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT