बाबासाहेबांच्या लेखणीची भाषा अलंकारी मात्र ती 'अतिरंजित' नाही- राज ठाकरे

"बाबासाहेबांच्या लेखणीची भाषा हि अलंकारीत आहे मात्र ती 'अतिरंजित' नाही"तसेच त्यांनी कधीही इतिहासाला धक्का लावला नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.
बाबासाहेबांच्या लेखणीची भाषा अलंकारी मात्र ती 'अतिरंजित' नाही- राज ठाकरे
बाबासाहेबांच्या लेखणीची भाषा अलंकारी मात्र ती 'अतिरंजित' नाही- राज ठाकरेSaam TV

मनसे अध्यक्ष हे सध्या पुणे दौऱ्यावरती असून त्यांनी आज सकाळी शिवशाहीर, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरेना शाल आणि पुणेरी पगडी घालून, पुष्पगुच्छ भेट दिला. तसेच बाबासाहेबांच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. यावेळी तेथे उपस्थित पत्रकारांसोबत राज ठाकरेंनी संवाद साधला, त्यांनी अन्य विषयांवरती भाष्य केलं. बाबासाहेब पुरंदरे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडून मराठी भाषेबाबत आणि इतिहासाबाबतच्या अनेक गोष्टी मी समजून घेत असतो आणि ते माझ्या आवडीच काम आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

तसेच बाबासाहेबांच्या लेखणीची भाषा हि अलंकारीत आहे मात्र ती 'अतिरंजित' नाही तसेच "पुरंदरेनी कधीही इतिहासाला धक्का लावला नाही, आणि दंतकथांना इतिहासात शिरकून दिलं नाही." असं वक्तव्य सुध्दा राज ठाकरेंनी केलं.The language of Babasaheb's writing is ornate

'शिवाजी महाराजांच्याShivaji Maharaj इतिहासाच्याHistory गोष्टींमधला एक किस्सा जो तानाजी मालुसरें बाबत आहे तो म्हणजे सिंहगड काबिज करताना गडावरती घोरपडीला दोरखंड बांधलेला, मात्र तो किस्सा दंतकथा आहे.' तसेच दंतकथा या छान असतात मात्र त्या सत्य नसताता असही राज ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे, लतादीदी, बाबासाहेबांचे आपुलकीचे संबध

बाळासाहेब ठाकरे बाबासाहेब आणि लतादीदी यांचे खूप आपुलकीचे संबध होते आणि त्यांचे किस्से त्यांच होणारं बोलणं मी अनुभवलं या बाबतीत मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो असही ठाकरे म्हणाले.Balasaheb Thackeray Lata Mangeshkar

बाबासाहेंबाविषयी जातियवाद्यांनी नको त्या गोष्टी निर्माण केल्या

बाबासाहेबांच्या लेखणीची भाषा अलंकारी मात्र ती 'अतिरंजित' नाही- राज ठाकरे
बाबासाहेबांनी इतिहासाला कधीही धक्का लावला नाही : राज ठाकरे

बाबासाहेब पुरंदरे 'आरएसएस'ला RSS उपकारक असं लिखाण करतात असं बोलंल जात याबाबत तुम्हला काय वाटत असं राज ठाकरेंना विचारलं तेव्हा ते म्हणाले.

"ज्यांना जातींमधून मतदान हवं आहे, तसेच जाती-जातींमध्ये भांडण लावून आपला राजकीय लाभ करवून घ्यायचा असतो असे लोकं असल्या खोट्या गोष्टी निर्माण करतात तसंच स्वत: काहीही वाचायच नाही आणि जेवढे भेद निर्माण करता येतील तेवढे करायचे येवढच काम ते करतात. आणि तसं करणारे सगळे किरकोळ लोकं आहेत." असही राज ठाकरे म्हणाले.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com