Irshalwadi Landslide Saam Tv
महाराष्ट्र

Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडी दुर्घटनेचा चौथा दिवस! मृतांचा आकडा २९ वर, ७६ जण अद्यापही बेपत्ता

Khalapur Irshalgad Landslide: अशामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सध्या बचावकार्य थांबवण्यात आले आहे.

Priya More

Irshalwadi News: रायगड जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Landslide) बुधवारी दरड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले. या दुर्घटनेचा आज चौथा दिवस आहे. घटनास्थळावर गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ वर पोहचला आहे. तर ७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटना होऊन आज चार दिवस झाले. चौथ्या दिवशीही सकळी 6 वाजल्यापासून बचावकार्य सुरु करण्यात आले. आज सकाळपासून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा हा २९ वर पोहचला आहे. तर ७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता असणारे सर्वजण जीवंत असतील की नाही याची शंका व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. पण पाऊस, धुके आणि चिखल यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अशामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सध्या बचावकार्य थांबवण्यात आले आहे.

आजही पूर्णदिवस बचावकार्य केले जाणार आहे. पण आज संध्याकाळपर्यंत बचावकार्य थांबवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन हे बचावकार्य थांबवले जाऊ शकते. तळीये दुर्घटनेप्रमाणेच बचावकार्य थांबवत इतर बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्याची आशा नाही. तरी देखील जनतेच्या भावना लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवण्यात येणार आहे'

दरम्यान, घटनास्थळावर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. आपला माणून ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढला जाईल या आशेने ते वाट पाहत तिथेच बसले आहेत. रडून रडून या सर्वांच्या डोळ्यातील अश्रू आटले आहेत. आपल्या माणसाचा बचाव व्हावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत. इर्शाळवाडीची दुर्घटना घडली त्यावेळी ४६ घरांवर दरड कोसळली. या गावामध्ये २२९ जण राहत होते. काही जण गावाबाहेर गेले असल्याने आणि काही जण गावातील शाळेमध्ये झोपायला गेल्यामुळे बचावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT