Sanjay Raut On Devendra Fadnavis: 'सगळे भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षात जाऊन शुद्ध झाले', चक्की पिसिंगवरुन संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांचा 'अजित पवार चक्की पिसिंग अ‍ॅण्ड चक्की पिसिंग' हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
Devendra fadnavis - Sanjay Raut
Devendra fadnavis - Sanjay RautSaam tv
Published On

जयश्री मोरे, मुंबई

Mumbai News: राज्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांच्यावर २०१४ मध्ये सिंचन घोटाळा प्रकरणी जेलमध्ये जातील असे वक्तव्य केले होते. फडणवीसांचा 'अजित पवार चक्की पिसिंग अ‍ॅण्ड चक्की पिसिंग' हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आता याच व्हिडिओवरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.'सगळे भ्रष्ट्राचारी त्यांच्या पक्षात जाऊन शुद्ध झाले.', अशी टीका त्यांनी केली आहे.

Devendra fadnavis - Sanjay Raut
Funding For NCP MLA By Finance Minister: अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्थमंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव, किती निधी केला मंजूर?

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीसांच्या चक्की पिसिंगच्या वक्तव्यावरुन संजय राऊत यांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी चक्की किसिंग चक्की पिसिंगचा नारा दिला होता. त्याच्या या नाऱ्यांमध्ये हे सगळे भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षात गेले आणि शुद्ध झाले. आम्ही काय करणार आमच्यावर चक्की पिसण्याची वेळ आली. योग्य वेळी बोलू. त्याचा खुलासा आपोआप होईल.'

Devendra fadnavis - Sanjay Raut
Mumbai Dam Water Level Today: मुंबईकरांचा पाणीप्रश्न सुटणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

मणिपूरच्या घटनेवर नुकताच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'अण्णा हजारे या निमित्ताने सक्रिय आहेत हे दिसले हे बरं झालं. अण्णा काहीतरी बोलतील गेल्या वर्षापासून आम्ही मागणी करतोय आणि अण्णांनी थेट मणिपुरलाच हात घातला. खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना देशांमध्ये खूप घडत आहेत. अण्णा हजारे हे भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे नेते म्हणून ओळखले जातात.'

Devendra fadnavis - Sanjay Raut
HBD Suriya : अलिशान गाड्या अन् करोडोंची संपत्ती साऊथचा 'हा' बडा अभिनेता बॉलिवूड स्टार्सलाही टाकतोय मागे

'महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यासह भारतीय जनता पक्षाने केले. ते सगळे लोक शपथ घेऊन मंत्रिमंडळामध्ये सामील झाले. अण्णा हजारे यांनी यावर आवाज उठवला पाहिजे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. अण्णा हजारे यांनी या विषयावरती आपली भूमिका व्यक्त करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. माझी अण्णांना हात जोडून विनंती आहे हा देश वाचवायचा आहे. तुम्ही देश वाचवायची भूमिका घेतलेली आहे. आज खरी आंदोलनाची गरज आहे.', असे संजय राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com