गिरीश कांबळे
Mumbai Dam News: गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्यात वाढ होऊ लागल्याने १० टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Latest Marathi News)
मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे.
हवामाना विभागाने आज रविवारी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दिवसभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईला दररोज होणारा पाणीसाठा पाहता हे पाणी जानेवारीपर्यंत पुरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आता मुंबईत सुरु असलेला जोरदार पाऊस असाच सुरु राहिल्यास येत्या काही दिवसांत पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून मुंबईमध्ये लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची शक्यता आहे.
मुंबईतील पाण्याची सध्याची स्थिती?
अप्पर वैतरणा -43 हजार 657 दशलक्ष लिटर (19.20 टक्के)
मोडक सागर - 96 हजार 919 दशलक्ष लिटर (75.17 टक्के)
तानसा - 1 लाख 25 हजार 717 दशलक्ष लिटर (86.66 टक्के)
मध्य वैतरणा - 10 लाख 8 हजार 816 दशलक्ष लिटर (56.23 टक्के)
भातसा - 28 लाख 3 हजार 984 दशलक्ष लिटर (39.61 टक्के)
विहार - 21 हजार 2 दशलक्ष लिटर (75.82 टक्के)
तुळशी - 8 हजार 46 दशलक्ष लिटर (100 टक्के)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.