Irshalwadi Landslide  Saam Tv
महाराष्ट्र

Irshalwadi Landslide Update: मासेमारी करून गावात पोहचले, डोळ्यांसमोर अख्खं गाव गायब झालं; ग्रामस्थांनी सांगितलं रात्री नेमकं काय घडलं?

Khalapur Irshalwadi News: नेमकं कालच्या रात्री काय घडलं याबाबतची भयावह माहिती याच गावामध्ये राहणाऱ्या काही गावकऱ्यांनी सांगितली आहे.

Priya More

Irshalwadi Landslide: रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीसाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली. मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीवर दरड (Irshalwadi Landslide) कोसळली. या गावातील जवळपास ४० पेक्षा जास्त घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. रात्री संपूर्ण गाव झोपेत असताना ही घटना घडली.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वांचे लक्ष या घटनेकडेच लागले आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जण मलब्याखाली अडकले आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. नेमकं कालच्या रात्री काय घडलं याबाबतची भयावह माहिती याच गावामध्ये राहणाऱ्या काही गावकऱ्यांनी सांगितली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. इर्शाळगडाच्या आसपासच्या परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावामध्ये राहणारे काही गावकरी या पावसामध्येच मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करुन झाल्यानंतर रात्री उशिरा हे गावकरी आपल्या घराकडे परत जात होते.

इर्शाळवाडीमध्ये पोहचल्यानंतर ११ वाजताच्या सुमारास डोंगराचा काही भाग खचत असल्याचे या गावकऱ्यांच्या लक्षात आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच डोंगराचा काही भाग इर्शाळवाडीतील घरांवर पडल्याचे त्यांना दिसले. डोळ्यासमोरच त्यांना त्यांची संपूर्ण इर्शाळवाडी गायब झाल्याचे दिसले. हे पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

वेळ न घालवता या गावकऱ्यांनी तात्काळ गावातील सरपंच आणि इतर गावकऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. ४० ते ४५ घरं असलेली आणि २५० पेक्षा जास्त जण राहणाऱ्या इर्शाळवाडीवर डोंगर कोसळल्याचे पाहून कोणालाच काय करावे कळत नव्हते.

एकीककडे मुसळधार पाऊस असे असताना त्यांनी देखील तात्काळ स्थानिक पोलीस आणि तहसील कार्यालयाला याची माहिती दिली. त्यानंतर इर्शाळवाडीवर दरड कोसळ्याची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. या घटनेची माहिती कळताच इर्शाळवाडीमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपले नातेवाईक ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे सर्वांनी एकच आक्रोश केला.

रात्री १२.३० वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मदतकार्यासाठी एकापाठोपाठ एक सर्व पथक दाखल झाले. अग्निशमन दल, एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री २.४५ वाजता बचावकार्य सुरु केले. डोंगराळ भाग, त्यात मुसळधार पाऊस आणि लाईट नसल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. सकाळपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत कार्य केले जात आहे. पण खराब हवामानामुळे त्यात देखील अडथळे येत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत सात जणांचे मृतदेह मलब्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. महिला, पुरुष, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक, पाळीव प्राणी ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. त्यांच्या वाचवण्याठी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT