Chhagan Bhujbal News : रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी (Irshalwadi landslide) मोफत शिवभोजन थाळीचे (shiv bhojan thali) पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे. त्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बाेलताना सविस्तर माहिती दिली. (Maharashtra News)
इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या (landslides) पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. त्यानूसार कार्यवाहीस प्रारंभ झाल्याची माहिती मंत्रालयीन अधिका-यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
भूजबळ म्हणाले आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार आहे.
जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.