maharashtra international brahmin parishad, Kolhapur News, NCP, Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : देवेंद्र फडणवीसांना जमलं नाही ते जयंत पाटलांनी करुन दाखवलं : आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद ब्राह्मण सामाजाच्या समस्या जाणून घेत असते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली नाही परंतु ब्राह्मण समाजासाठी अमृत संस्था स्थापन होण्यास महाविकास आघाडी सरकाराने माेलाची मदत केली असे आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांनी नमूद केले. दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पाठीशी खंबीर राहणार असल्याचे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेने नुकतेच काेल्हापूरात जाहीर केले आहे. (Maharashtra News)

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी म्हणाले आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद सन २०१९ पासून ब्राह्मण सामाजाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे.

यासाठी गेल्या चार वर्षात गोलमेज परिषद, अधिवेशने आणि खुल्या प्रवर्गासाठी शासन दरबारी अनेक मागण्या केल्या. सन २०१९ पूर्वी ब्राह्मण समाजाने मुंबईत आंदोलन (aandolan) केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन दिले. पण त्याचे पुढे काहीही झाले नाही.

पुढे आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदने २२ जानेवारी २०२० रोजी जयंत पाटील (jayant pati) यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना ब्राह्मण सामाजाच्या समस्याचे निवेदन दिले. त्या जाणून घेत,संबधित खात्याची बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा सूचना केल्या.या संदर्भांतील पाठपुराव्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचाच पाठिंबा होता.

त्यावेळी अंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेवर राष्ट्रवादीच्या बरोबर जाणारे लोक म्हणून भाजपातील बुद्धिजीवी लोक आम्हाला हिणवायचे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ब्राह्मण समाजाचा विरोध करणारा राष्ट्रवादी पक्ष असे म्हणणाऱ्या भाजपाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना गळ्यात गळे घालून सरकारमध्ये सहभागी करून घेतलं आहे.

एकीकडे आम्ही समाजासाठी काम करत असताना समाजातीलच काही लोकांकडून होणारी अवहेलना दुःखद असायची. पण आता भाजपनेच राष्ट्रवादीला बरोबर घेतल्याने त्यांनाही खडे बोल सुनवायची तयारी कार्यकर्ते दाखवतील का असा सवालही यावेळी कुलकर्णी यांनी केला.

दरम्यान समाजाला आपला हक्काचा मतदार म्हणून त्या पक्षाने ब्राह्मण समाजाला ग्रहीत धरू नये. कोणत्याही पक्षाने ब्राह्मण समाजाला मदत केली तरच ब्राह्मण समाज त्या पक्षाच्या पाठीशी असणार आहे. तसेच समजाने सुद्धा एका पक्षावर प्रेम आणि दुसऱ्या पक्षावर द्वेष करू नये. समाजाने आपले समाजहीत पहावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या वतीने करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT