siddheshwar sahakari sakhar karkhana chimney, solapur saam tv
महाराष्ट्र

Solapur News : 'सिद्धेश्वर' ची चिमणी पुन्हा उभारा : एमआयएमची शासनास मागणी

siddheshwar sahakari sakhar karkhana chimney : धर्मराज काडादी यांना न्याय मिळावा असे शाब्दी यांनी माध्यमांशी बाेलताना म्हटलं.

विश्वभूषण लिमये

Solapur News : ज्यांनी सिद्धेश्वरची चिमणी पाडली आहे त्यांनी ती पुन्हा उभा करावी अशी मागणी एआयएमआयएम नेते फारुक शाब्दी यांनी केली आहे. शाब्दी यांनी शिष्टमंडळासह सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांची भेट घेतली. याभेटीनंतर शाब्दी यांनी शासनाशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले. (Maharashtra News)

शाब्दी म्हणाले शेतकऱ्यांना (farmers) उसाचा चांगला दर आणि तेही वेळेवर देणारा कारखाना म्हणून सिद्धेश्वरची ख्याती आहे. त्या कारखान्याला तुम्ही सोडत नाही. सोलापूर जिल्हा हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

इथं असे पण साखर कारखाने आहेत. जे फक्त ऊस घेतात आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत नाहीत असे कारखाने आज सुरू आहेत. वेळेवर पैसे देणारा सिद्धेश्वर कारखाना आज बंद आहे. लवकरात लवकर धर्मराज काडादी यांना न्याय मिळावा असे शाब्दी यांनी माध्यमांशी बाेलताना म्हटलं.

चिमणी पुन्हा उभारा

विमान सेवा सुरू करण्यासाठी कारखान्याची चिमणी पाडली असं सांगतात. माझा प्रशासनाला प्रश्न आहे. विमानतळ व्हायला पाहिजे मात्र विकसित असलेला कारखाना बंद पाडून हजारो शेकडो शेतकऱ्यांचे आणि कामगार यांचे घर बंद पाडून सोलापूरकरांना विकास नाही पाहिजे आहे. ज्यांनी चिमणी पाडली आहे. त्यांनी ती पुन्हा उभी करावी अशी मागणी एआयएमआयएम पक्षाकडून करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT