Who is Aniket Patwardhan in BJP Maharashtra saam TV Marathi
महाराष्ट्र

Konkan Politics : ठाकरेंना कोकणात भाजपकडून धक्क्यावर धक्के, पडद्याकडून कुणी केली खेळी? चेहरा आला समोर

How BJP is expanding in Konkan region : ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजपकडून मविआला धक्का बसलाय. रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू शिलेदार अनिकेत पटवर्धन यांनी पडद्यामागून भाजपच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं समोर आलं आहे. कोकणातील इनकमिंगमागे पटवर्धन यांची रणनीती ठरल्याची चर्चा आहे.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Who is Aniket Patwardhan in BJP Maharashtra : राज्यात मविआची स्थापना झाल्यानंतर भाजपकडून कोकणात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. ठाकरेंनी राजीनामा दिला अन् राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर ऑपरेशन लोटसला आणखी बळ मिळालं. भाजपकडून कोकणात मविआची कोंडी करण्यात आली. एकापाठोपाठ एक दिग्गजांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा सुरू झाला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले. भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी पडद्यामागून तरूण चेहरा झटत असल्याचे समोर आलेय. इनकमिंग मागील खरा चेहरा आता समोर आलाय. रवींद्र चव्हाण यांचा विश्वासू शिलेदार अनिकेत पटवर्धन याने कोकणात भाजप वाढवण्यात मोठी कामगिरी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात भाजपमध्ये आणखी इनकमिंग सुरूच राहणार आहे. अनिकेत पटवर्धन यांच्याकडून मविआळा धक्का देण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. पुढील काही दिवसात कोकणातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश कऱणार असल्याचे समजतेय. धैर्यशील पाटीलपासून वैभव खेडेकरांपर्यंत बडे मासे गळाला लावण्यात पटवर्धनांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वासू म्हणून अनिकेत पटवर्धन याने गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. भाजपने दिलेल्या कोकणातील काम पटवर्धन यांनी चोख बजावल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. कोकणात महायुतीत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये समन्वय राखण्यात अनिकेत पटवर्धनमुळे भाजपला यश आल्याचे काहीजण सांगत आहे.

कोण आहेत अनिकेत पटवर्धन?

अनिकेत पटवर्धन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचा विश्वासू शिलेदार म्हणून ओळखलं जातेय. हॉटेलमध्ये नोकरी करत शिक्षण पूर्ण केले. त्या काळात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पटवर्धन यांनी आवाज उठवत राजकीय करिअरला एकप्रकारे सुरूवात केली. भाजपच्या संघटनात्मक पातळीवर कार्य करताना त्यांनी कोकणातील राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. संयम, संवाद आणि परिणामकारक निर्णय या तीन गुणांवर पटवर्धन यांनी भाजपमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनिकेत पटवर्धन यांच्याकडं रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक म्हणून विधानसभेत जबाबदारी होती. वरिष्ठ नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय साधण्याची त्यांची क्षमता त्यांची खरी ताकद असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Politics: अजित पवारांचा भाजपला 'दे धक्का'! डाव पलटवणारा नेता फोडला, शहा यांचा पक्षाला रामराम

Diwali 2025: दिवाळीत घरात या शुभ वस्तू नक्की ठेवा, सुख-शांती आणि समृद्धी नांदेल

Maharashtra Live News Update: विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणात तिघांचे निलंबन; ॲट्रॉसिटी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Hair Growth Tips: कापलेले केस वाढत नाहीत? मग या टिप्सचा लगेचच करा फॉलो

Bhajani Chakali Recipe : भाजणीचे पारंपरिक सीक्रेट जाणून घ्या, चकली होईल खमंग-कुरकुरीत

SCROLL FOR NEXT