Police officials display recovered gold jewellery and seized items after arresting two accused in the wedding theft case linked to Indurikar Maharaj’s daughter’s ceremony. Saam tv
महाराष्ट्र

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरट्यांचा डल्ला; 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल लंपास

Indurikar Maharaj Daughter Wedding Theft Case Details: इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या संगमनेर येथील विवाह सोहळ्यात चोरीची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी 2 लाख 90 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

संगमनेर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी 2 लाख 90 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आणि राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. उपस्थितांमधील एकाचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याने त्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी दोन जण मोटार सायकलवर राहाता तालुक्यातील ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्याकडून 1,50,000 रुपये किंमतीचे साडेअकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सागर सुरेश कांबळे आणि अब्दुल इब्राहिम पिंजारी अशी आरोपींची नावे असून, साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

सर्व आरोपी हे श्रीरामपूर शहरातील रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. पोलिस या चोरीच्या घटनेचा अधिकचा तपास करत असून आरोपींकडून चोरीच्या इतर काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT