पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी रणनीती आखलीय. पाकड्यांची जमीन, पाणी आणि हवेतही कोंडी केलीय. नेमकी भारताची रणनीती काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानची नाकेबंदी सुरु केलीय. आधी सिंधू करार रद्द करत पाकिस्तानला तगडा झटका दिलाय. तर दुसरीकडे वाघा आणि अटारी बॉर्डर बंद करत देशातून पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केलीय. हे कमी होतं की काय, आता भारताने आता थेट पाकिस्तानची हवाई कोंडी केलीय. त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे? पाहूयात.
पाकवर हवाई स्ट्राईक
हवाई हद्द बंद केल्याने पाकिस्तानला दरमहा 2 कोटी 28 लाख डॉलरचा तोटा
थायलंड, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया प्रवासाला वेळ लागणार
दक्षिण आशियाई देशांसाठी चीन थायलंडमार्गे जावं लागणार
प्रवासाचा खर्च वाढल्याने पर्यटक घटण्याची शक्यता
पाकिस्तानचा दक्षिण आशियाई आणि अग्नेय आशियाई देशांसोबतचा व्यापार मंदावण्याची शक्यता
पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनीती आखलीय. आतापर्यंत भारताने वेगवेगळे स्ट्राईक करत पाकिस्तानला रडकुंडीला आणलंय.
भारताचे स्ट्राईक, पाकच्या नाकात दम
सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानची पाणीकोंडी
वाघा-अटारी बॉर्डर बंद करुन दुसरा धक्का
पाकिस्तानी उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश
पाकिस्तानी युट्यूबरचे अकाऊंट हटवले
सेनेला खुली सूट देऊन युद्धसज्जतेचे संकेत
वॉटरस्ट्राईकनंतर भारतीय विमानांसाठी पाकिस्तान सरकारने हवाई हद्द बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारतानेही पाकिस्तानला जशास तसं नव्हे तर त्यापुढे जाऊन उत्तर दिलंय. त्यामुळे पाकिस्तान केवळ पाण्यावाचून नव्हे तर आता आर्थिक कोंडीही झाल्याने पै-पै साठी तडफडल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.