solar power project starts on Samruddhi Mahamarg, India’s first highway electricity generation initiative. saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती; देशातील पहिला प्रयोग; किती मेगावॅटची होणार निर्मिती, जाणून घ्या

Samruddhi Mahamarg to Generate Electricity: समृद्धी महामार्गावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालाय. बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प तयार करण्यात आलाय. हा देशातील पहिला महामार्गावरचा वीज निर्मिती प्रकल्प आहे.

Bharat Jadhav

  • समृद्धी महामार्गावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

  • बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

  • हा देशातील पहिला महामार्गावरचा वीज निर्मिती प्रकल्प आहे.

नागपूर-मुंबईला जोडणारा हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. या महामार्गावरून आतापर्यंत सव्वा दोन कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केलाय. महामार्गावर वीज निर्मिती होणार आहे. बुलढाणा येथील कांरजालाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय. हा प्रकल्प आता कार्यान्वित झालाय.

सौरऊर्जा निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरलाय. पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील तालुका कांरजालाड व वाशिममधील तालुका मेहकर, येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पाची क्षमता ९ मेगावॅट असून त्यापैकी कांरजालाड येथील ३ मेगावॅट व मेहकर येथील प्रकल्पातून २ मेगावॅट वीज निर्मितीस सोमवारी प्रारंभ झालाय. त्यामुळे महामार्गावर सौर ऊर्जेच्या निर्मित्ती प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या आखणीपासूनच वेगवान प्रवासाबरोबर सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट महामंडळाने आखलं होतं. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर २०४ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला होता. सौरऊर्जा निमितीच्या माध्यमातून महामंडळाला पथकराव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवीन स्त्रोत उपलब्ध झालाय.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची विशेष उद्देश वाहन कंपनी महासमृद्धी रिन्युएब्ल एनर्जी लि. व महावितरण यांच्या दरम्यान सन २०२२ मध्ये झालेला करारान्वये या विजेची विक्री करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजने अंतर्गत निविदा प्रक्रियेत भाग घेत महामंडळाने प्रति युनिट रु. ३.०५ पैसे दर दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

क्षणात होत्याचं नव्हतं! ५७ प्रवाशांनी भरलेली धावती बस आगीच्या भक्ष्यस्थानी; १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Arthritis joint care tips: संधिवाताबद्दल जाणून घ्या 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी; सांध्यांची काळजी घेणं गरजेचं

ZP Teachers Salary: जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची "दिवाळी होणार गोड"; सरकारचा मोठा निर्णय

APJ Abdul Kalam: अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

SCROLL FOR NEXT