
आयटीआर रिफंड मिळण्यासाठी साधारण ७ ते ४५ दिवस लागतात.
परतावा ई-फायलिंग पोर्टल किंवा NSDL वेबसाइटवर तपासता येत असतो.
चुकीची माहिती, पडताळणी न होणे किंवा तफावत असल्यास रिफंडला उशीर होत असतो.
इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२५ होती. या तारखेपर्यंत बहुतेक करदात्यांनी त्यांचे रिटर्न भरले. आता ते त्यांच्या कर परताव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु अनेकदा असे होतं की परतफेड परतावा मिळण्यास विलंब होतो आणि लोकांना त्यामागील कारण समजत नाही.
परतावा मिळण्यापूर्वी, तुमचा आयटीआर प्राप्तिकर विभागाने स्वीकारला पाहिजे आणि त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. दाखल केलेल्या रिटर्नमध्ये काही तफावत किंवा विसंगती आढळली तर , विभागाकडून तुम्हाला एक संदेश किंवा सूचना पाठवली जाते, त्याला उत्तर देणे आवश्यक आहे.
तुमचा आयटीआर ई-व्हेरिफाय झाल्यानंतर परतावा प्रक्रिया सुरू होते. तुमचे रिटर्न दाखल केल्यानंतर चार ते पाच आठवड्यांच्या आत पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. पण कधीकधी तुमचे सर्व तपशील आयकर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीशी म्हणजेच AIS, TIS आणि फॉर्म 26AS देण्यात आलेली माहिती जर जुळत असतील तर परतावा लवकर मिळू शकतो.
आता परतफेड प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप जलद झालीय. साध्या प्रकरणांमध्ये कर परतफेड सात दिवसांच्या आत मिळू शकते. जर व्यवसायिक उत्पन्न, भांडवली नफा किंवा विविध वजावटींशी संबंधित प्रकरणांमध्ये, अतिरिक्त छाननी आवश्यक असते, त्यामुळे परतावा येण्यास दोन ते चार आठवडे लागू शकतात.
ई-व्हेरिफिकेशननंतर, आयकर विभाग रिटर्नची प्रक्रिया सुरू करतो. परतावा साधारण २ ते ५ आठवड्यांच्या आत येत असतो. योग्य माहिती आणि कमी रकमेसह परतफेड लवकर पूर्ण केली जाते, तर मोठ्या रकमेसह किंवा त्रुटी असलेल्या परतफेडमध्ये जास्त वेळ लागू शकतो.
www.incometax.gov.in वर जा आणि तुमचा पॅन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
वरच्या मेनूमधून "Services" वर जा आणि Know your Refund Status वर क्लिक करा.
आता ई-फाइल टॅबवर जा आणि इन्कम टॅक्स रिटर्न निवडा आणि नंतर व्ह्यू फाइल्ड रिटर्न पर्याय निवडा.
तुम्हाला तुमच्या इच्छित मूल्यांकन वर्षासाठी रिफंड स्टेटस दिसेल.
बँक खाते पूर्व-प्रमाणित केलेले नसेल.
बँक खात्यावरील नाव पॅन कार्डवरील नावापेक्षा वेगळे असेल तर.
आयएफएससी कोड चुकीचा किंवा अवैध असेल.
आयटीआरमध्ये नमूद केलेले खाते बंद असेल.
पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल.
तुमचा आयटीआर ई-व्हेरिफाय झाला असेल आणि सर्व तपशील बरोबर असतील, तर तुमचा कर परतावा साधारणपणे २ ते ५ आठवड्यांच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.