Indian Politics Saam Digital
महाराष्ट्र

Indian Politics: साडेचारशे रुपयांमध्ये सिलिंडर देण्याचं आश्वासन PM नरेंद्र मोदी पूर्ण करणार का?, भाजप, काँग्रेससंदर्भात काय म्हणाले कन्हैया कुमार, जाणून घ्या

Indian Politics: ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे रुपयात सिलिंडर देण्याचं आश्वासन दिलं होतं, गुजरात, महाराष्ट्रात त्यांचंच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी हे आश्वासन पूर्ण करावं, महाराष्ट्रातही साडेचारशे रुपये प्रमाणे सिलिंडर देण्याची मागणी कन्हैया कुमार यांनी केली आहे.

Sandeep Gawade

Indian Politics

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश आले असेल तरी, काँग्रेस लोककल्याणासाठी काम करत राहील. या देशात कोणतीही व्यक्ती किंवा पार्टीच्या बाजूने हवा नाही. या देशात घटनात्मक लोकशाही हवी असेल तर काँग्रेस सोबत येणे आवश्यक आहे, असं काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन रॅलीसाठी अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे आले असताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.

दरम्यान ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे रुपयात सिलिंडर देण्याचं आश्वासन दिलं होतं, गुजरात, महाराष्ट्रात त्यांचंच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी हे आश्वासन पूर्ण करावं, महाराष्ट्रातही साडेचारशे रुपये प्रमाणे सिलिंडर देण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसला जे लोक मतदान करत नाहीत त्यांना विचारले तरी तेही हेच सांगतील की काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, लोकशाही टिकवून ठेवली,सामान्य माणसाला रोजी आणि रोजगार दिला.सरकारी नोकऱ्या काँग्रेस नेच दिल्या. काँग्रेस म्हणजे लोककल्याणकारी पक्ष अशी या पक्षाची सर्वसामान्य लोकांमध्ये एक प्रतिमा झालेली आहे. हीच प्रतिमा घेऊन आम्ही सामान्य माणसात जाऊन काम करणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन राज्यात काँग्रेसला सत्ता मिळाली नसली तरी आम्ही हरलो नाही, आमच्यात निराशा असली तरी आम्ही महिला युवक,शेतकरी सर्व आघाड्यांवर नव्या दमाने कामाला लागू असा आशावाद काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार यांनी व्यक्त केला... कन्हैया कुमार डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन रॅलीसाठी अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

लाखांचं सोनं 100 रुपयांवर येणार? सोन्याची किंमत का घसरणार?

अॅग्रीमेंट रिलेशनशीप, लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? मुलींना फसवण्यासाठी नवं जाळं?

RCB Player: १५ वर्षांच वनडे करिअर संपलं, ढसाढसा रडत सोडलं मैदान, आरसीबीतील महत्त्वाच्या खेळाडूची निवृत्ती

SCROLL FOR NEXT