Railway News Saam Tv
महाराष्ट्र

Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

Central Railway Tatkal Ticket Otp Verification News : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी ६ डिसेंबर २०२५ पासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी पडताळणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. पारदर्शकता वाढवणे आणि फसवणुकीवर आळा घालणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.

Alisha Khedekar

  • तत्काळ तिकिटांसाठी OTP पडताळणी प्रक्रिया अनिवार्य

  • गैरवापर आणि बोगस तिकिटांवर आळा बसणार

  • IRCTC अ‍ॅप, एजंट आणि काउंटर बुकिंगवरही लागू

  • प्रवाशांनी मोबाईल नंबर अचूक नोंदवण्याचे आवाहन

रेल्वे प्रवाशांना आता तात्काळ तिकिट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणालीचा लाभ घेता येणार आहे. भारतीय रेल्वे ६ डिसेंबर २०२५ पासून मध्य रेल्वेमध्ये तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू करणार आहे. ही नवी प्रणाली काही मोजक्याच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लागू केली जाणार आहे.

ही नवीन प्रणाली संगणकीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट आणि आयआरसीटीसी वेबसाइट/अ‍ॅपद्वारे बुक केलेल्या तत्काळ तिकिटांसाठी लागू असेल. या प्रक्रियेअंतर्गत, प्रवाशांना बुकिंगच्या वेळी दिलेल्या मोबाइल नंबरवर वन टाईम ओटीपी मिळणार आहे. यशस्वी ओटीपी पडताळणीनंतरच तत्काळ तिकिट जारी केले जाईल. या उपाययोजनेचा उद्देश पारदर्शकता आणखी वाढवणे, गैरवापर रोखणे आणि तात्काळ कोट्यातील बुकिंगचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा याची खात्री करणे हा आहे.

६ डिसेंबर पासून 'या' गाड्यांसाठी सुविधा लागू केली जाईल

  • 12219 लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस

  • 12221 पुणे – हावडा दुरांतो एक्सप्रेस

  • 12223 लोकमान्य टिळक टर्मिनस– एर्नाकुलम जंक्शन दुरांतो एक्सप्रेस

  • 12261 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस– हावडा दुरांतो एक्सप्रेस

  • 12263 पुणे – हजरत निजामुद्दीन जंक्शन दुरांतो एक्सप्रेस

  • 12289 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरांतो एक्सप्रेस

  • 12290 नागपूर – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस

  • 12293 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस

  • 12298 पुणे – अहमदाबाद जंक्शन दुरांतो एक्सप्रेस

  • 20101 नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस

  • 20670 पुणे – हुबळी जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस

  • 20673 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस

  • 20674 पुणे – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

  • 12025 पुणे – हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस

  • 22221 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजरत निजामुद्दीन जंक्शन राजधानी एक्सप्रेस (दि. 05.12.2025 पासून)

दरम्यान ही प्रणाली 12025 पुणे – हैदराबाद शताब्दी एक्सप्रेससाठी ही १ डिसेंबर पासूनच लागू करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंग करताना आपला मोबाईल क्रमांक अचूकरीत्या नमूद करावा. तसेच या नव्या प्रणालीने प्रवाशांच्या प्रवासाचा भार हलका होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT