Tiger Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून घातली झडप, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Maharashtra Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघाने शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करून तिला ठार केले आहे. यापूर्वीही दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.
Tiger Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून घातली झडप, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
Maharashtra Chandrapur TigerSaam Tv
Published On
Summary
  • चंद्रपूरमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाची झडप

  • हल्ल्यात महिला ठार

  • आठ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात २ महिलांचा मृत्यू

  • परिसरात भीतीचं वातावरण निर्माण

सर्वत्र बिबट्याची दहशत असताना आता वाघाने सुद्धा मानवी वस्तीत धुमाकूळ घातल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आरमोरी येथे पट्टेरी वाघाने शेतात काम करणाऱ्या महिलेवर झडप घातली. महिलेला काही कळायच्या आताच त्याने तिच्या शरीराचे लचके तोडत तिला ठार केले. या प्राणघातक हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून यापूर्वी शेतात काम करणाऱ्या २ महिलांचा देखील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. प्राण्यांच्या या भीतीने मानवी वस्तीत मात्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मृत झालेल्या महिलेचं नाव कुंदा खुशाल मेश्राम (६३) असे आहे. कुंदा या नेहमीप्रमाणे शेतीची कामे करत होत्या. यादरम्यान जवळच असेलल्या झुडपात शिकारीसाठी वाघ दबा धरून बसला होता. इतक्यात संधी साधून या वाघाने शेतात काम करत असलेल्या कुंदा यांच्यावर झडप घातली. त्यांच्या अंगाचे लचके तोडले.

Tiger Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून घातली झडप, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचे पंख छाटण्यास सुरूवात, टोळीतील विश्वासू जोडीदाराच्या मुसक्या आवळल्या

मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत असलेल्या कुंदा यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत कुंदा यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. कुंदा या घरी परतल्या नाहीत शिवाय परिसरातून वाघाच्या डरकाळी ऐकू येत असल्याने कुटुंबीयांनी कुंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केला. शोधाशोध सुरु असताना कुंदा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला.

Tiger Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून घातली झडप, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका! 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

दरम्यान कुंदा यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गावातील हे एकमेव उदाहरण नसून ८ दिवसांपूर्वी या भागात बिबट्याने धुमाकूळ घालत दोन महिलांना ठार केले. वन्यजीवांच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पासरले असून नागरिकांनी ताबडतोब यावर योजनेची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com