Naresh Mhaske’s sharp criticism: Accuses Uddhav Thackeray of betrayal amid India-Pakistan match controversy. saam tv
महाराष्ट्र

एकाशी लग्न, नंतर दुसऱ्यासोबत संसारासाठी निघून गेले; शिंदे गटाच्या खासदाराची सणसणीत टीका

India-Pakistan Asia Cup match sparks political war: शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यामुळे महाराष्ट्रात नव्याने राजकीय संघर्ष सुरू झालाय.

Bharat Jadhav

  • नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणीत टीका केली.

  • २०१९ पासून खुर्चीसाठी विश्वासघात केला, असा आरोप.

  • भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यावरून वाद पेटला.

  • शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला.

शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये. त्यांना नैतिक अधिकार नाहीये. पाकिस्तानचे गोडवे गाऊन सिंदूर या शब्दाचा अपमान त्यांनी केलाय. २०१९ ला एकाशी लग्न केले. त्यानंतर त्यांचे कुंकू पुसून दुसऱ्याशी खुर्चीसाठी संसार करण्यासाठी हे निघून गेले, अशा शब्दात शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Naresh Mhaske Slams Uddhav Thackeray Over Political Betrayal And India-pak Match Row)

आशिया कप टुर्नामेंटमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान समान होणार आहे. या सामन्यावरून राजकीय वातावरण तापलंय. भारत-पाकिस्तानच्या सामन्यावरून ठाकरे गटाने भाजपवर टीका केली. हा सामना म्हणजे देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचा अपमान असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सणसणीत उत्तर दिलं.

भारत-पाकिस्तानच्या सामन्यावरून उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना म्हस्के म्हणाले, आशिया चषक ही स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये एक सामना खेळला जात असेल भूमिकेत बदल झाला असं म्हणणं चुकीचं आहे. दोन देशात सामने होत नाहीत. हा सामना आशिया चषकचा भाग आहे, अजूनही पाकिस्तानला आयपीएलचे दरवाजे बंद आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जावरती क्रिकेट सामने या अगोदर देखील खेळले गेलेत. पंतप्रधानांबाबत आपण काय बोलतो हे ठाकरे गटाने भान ठेवलं पाहिजे. आपली पात्रता आपली कुवत ओळखूनच या संदर्भात बोललं पाहिजे,असं खासदार नरेश म्हस्के म्हणालेत.

खुर्ची करता काँग्रेससोबत निवडणुका लढवायच्या. काँग्रेसबरोबर फिरणे, त्याला निर्लज्जपणा म्हणतात. बॉम्ब स्फोट प्रकरणात आरोपींना घेऊन फिरणे याला निर्लज्जपणा म्हणतात. शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये. त्यांना नैतिक अधिकार नाहीये. पाकिस्तानचे गोडवे गाऊ सिंदूर या शब्दाचा त्यांनी केलाय, असं खासदार म्हस्के म्हणालेत. संजय राऊत भुकण्याचे काम करत आहेत. संजय राऊत यांनादेखील सिंदूर हा शब्द बोलण्याचा अधिकारी नाही. बाजार गुगॅनी या बाबत चिंता करू नये, असं शिवसेना खासदार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

OBC Reservation: ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं?

SCROLL FOR NEXT