Mla Ravi Rana Death Threat News Saam Tv
महाराष्ट्र

Mla Ravi Rana Threat: आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी; राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

Mla Ravi Rana Death Threat News: अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही

Mla Ravi Rana Death Threat News: अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे. तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर, नाहीतर तुझ्या जीवाचे काहीतरी करून टाकू... असा धमकीचा फोन रवी राणा (Mla Ravi Rana) यांना आला आहे. याबाबत रवी राणा यांच्या स्वीय सहाय्यकाकडून अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील अर्जुन लोखंडे नावाच्या व्यक्तिकडून रवी राणा यांना जीवे मारण्याची (Death Threat) धमकी आल्याचा आरोप केला जात आहे. तू आमच्या विरोधात कसा काय बोलतो, एवढ्या वेळेस थांब नाहीतर तुला संपवून टाकतो, अशी धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

इतकंच नाही, तर तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर... नाहीतर तुझ्या जीवाचे काही तरी करून टाकू... अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको... असं सुद्धा धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं असल्याची पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेते तसेच आमदारांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना एका व्यक्तीने फोनवरून धमकी दिली होती. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना सुद्धा धमकीचा फोन आला होता.

सरकारमधील दोन्ही मंत्र्यांना एकाच दिवशी फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, पुणे पोलिसांनी छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला रायगड येथून अटक केली. दारूच्या नशेत आपण धमकी दिल्याचं या व्यक्तीने सांगितलं. आता रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राज्यात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT